फेसबुकच्या मैत्रीखातर नोकरीच्या आमिषाला भुलली तरूणी अन् झाला घात, वाचा नक्की काय आहे प्रकरण!

सोशल मीडियावर झालेली मैत्री तरूणीला पडली महागात....

Updated: Aug 15, 2022, 04:31 PM IST
 फेसबुकच्या मैत्रीखातर नोकरीच्या आमिषाला भुलली तरूणी अन् झाला घात, वाचा नक्की काय आहे प्रकरण! title=

Crime News : सोशल मीडियावर झालेलं प्रेम किंवा मैत्री ही अनेकदा अडचणीत आणते. फसवणुक करणारा आरोपी सुरूवातीला गोड बोलून विश्वास जिंकून घेतात आणि त्यानंतर त्यांचे खरे रंग दाखवतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर झालेली मैत्री तरूणीला महागात पडली आहे. तरूणीला नोकरीसाठी बोलावत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Facebook Friend Rape)

नेमकं काय आहे प्रकरण? 
राजस्थानचा असणाऱ्या तरूणाची एका पंजाबच्या तरूणीसोबत फेसबुकवर ओळख होते. दोघांची मैत्री चांगली वाढते, दोघेही एकमेकांना आपला नंबर शेअर करतात. रोज त्यांचं बोलणं सुरू होतं आणि त्यावेळी तरूणी तिला जॉबची गरज असल्याचं त्या तरूणाला बोलते. याच गोष्टीचा फायदा आरोपी तरूण घेतो.

तरूणीच्या आई-वडिलांचं निधन झालेलं असतं, त्यामुळे ती नोकरीच्या शोधात असते. आरोपी तिला नोकरीचं आमिष दाखवतो आणि बोलावून घेतो. 10 ऑगस्टला तरूणी राजस्थानमधील धौलपूर शहरात येते. तरूण तिला घेतो आणि एका हॉटेलमध्ये घेऊन जातो. 

हॉटेलमध्ये गेल्यावर आरोपी जीवे मारण्याची धमकी देत तरूणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. त्यानंतर तरूणीवर बलात्कार करून आरोपी तिथून फरार होतो. पीडित तरूणी पोलीस ठाण्यामध्ये जात घडलेला प्रकार सांगत तरूणावर गुन्हा दाखल करते. 

नोकरीच्या आमिषाने किंवा मैत्री करत फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर झालेली ओळख मर्यादित ठेवावी नाहीतर यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.