नोटबंदी : बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांवर होणार कारवाई

नोटबंदी दरम्यान अनेकांनी आपल्या बँकेत मोठी रक्कम जमा केली आहे. त्यांच्यासाठी 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 28, 2017, 12:57 PM IST
नोटबंदी : बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांवर होणार  कारवाई  title=

नवी दिल्ली : नोटबंदी दरम्यान अनेकांनी आपल्या बँकेत मोठी रक्कम जमा केली आहे. त्यांच्यासाठी 

ही सर्वात मोठी बातमी असून आता लवकरच त्यांना याचा पश्चाताप होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच या नागरिकांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. ज्यांनी नोटबंदी दरम्यान बँकेत मोठी रक्कम जमा केलेली मात्र अद्याप त्यांचं कारण सांगितलेलं नाही. त्यांना या नोटीस मिळणार आहे. 

का पाठवणार नोटीस?

आयकर विभागाने जानेवारीपासून त्यांना नोटीस पाठवल्या जाणार आहेत. ज्यांनी आपल्या अकाऊंटमध्ये बेहिशेबी रक्कम जमा केली आहे. तसेच त्यांनी अद्याप आयकर रिटर्न जमा केले नाही अशांवर आता कारवाई होणार आहे. आयकर विभागाला सीबीडीटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा नागरिकांना ३१ डिसेंबरपर्यंत नोटीस पाठवा. आयकर नोटीस मिळाल्यानंतर या लोकांची पूर्ण चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी नोटिसला उत्तर दिलं आहे त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यानंतर ज्यांनी नोटबंदीच्या काळात काळा पैसा सफेद करण्याचा प्रयत्न केला. ती एक प्रकारी चोरीच केली आहे त्यांच्यावर आता स्वच्छ धन अभियानांतर्गत कारवाई केली जाणार आहे. 

१८ लाख लोकांवर होणार कारवाई 

स्वच्छ धन अभियानांतर्गत ऑनलाईन जी माहिती समोर आली आहे त्यानुसार १८ लाख लोकांवर प्रथम कारवाई होणार आहे. ज्यांनी नोटबंदी काळात म्हणजे ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान आपल्या बँक खात्यात बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. मात्र अद्याप त्यांनी २०१७ -१८ चे आयकर रिटर्न भरलेले नाही. त्यांना ईमेल आणि पोस्टाद्वारे नोटीस पाठवण्यात येणार आहे.