VIDEO : काश्मीरमधल्या मानवतेचा हा व्हिडिओ होतोय वायरल

सोशल मीडियावर एका लहानशा कुत्र्याचा एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 28, 2017, 10:40 AM IST
VIDEO : काश्मीरमधल्या मानवतेचा हा व्हिडिओ होतोय वायरल  title=

मुंबई : सोशल मीडियावर एका लहानशा कुत्र्याचा एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.

हा व्हिडिओ काश्मीरमधला आहे. खेळता खेळता एका पत्र्याच्या डब्यात एक लहानग्या कुत्र्याचं तोंड अडकलेलं असताना तो जीवाच्या आकांतानं विव्हळताना दिसतोय.

इथंच काश्मीर रहिवाशांमध्ये असलेल्या मानवतेचंही दर्शन घडतं... हे दृश्यं पाहणारे काही रहिवासी पुढाकार घेऊन त्या कुत्र्याला या प्रसंगातून कसे सोडवतात ते या व्हिडिओत दिसतंय...

 

आजुबाजुला असलेल्या अशांत वातावरणात आपला प्रत्येक दिवस ढकलताना काश्मीर जनतेत शिल्लक असलेल्या या माणुसकीचं दर्शन खूप काही सांगून जातं... त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना दिसतोय.