Delhi Crime : दिल्ली पुन्हा हादरली! व्यसनमुक्ती केंद्रातून परतलेल्या मुलाने आई, वडिलांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं

Delhi Crime : श्रद्धा वालकर प्रकरण ताजे असतानाच देशाच्या राजधानीत आणखी एक हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. घरातील चारही सदस्यांची हत्या आरोपीने केलीय

Updated: Nov 23, 2022, 01:05 PM IST
Delhi Crime : दिल्ली पुन्हा हादरली! व्यसनमुक्ती केंद्रातून परतलेल्या मुलाने आई, वडिलांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं title=

Delhi Crime : श्रद्धा वालकर प्रकरणानंतर (sharda walker case) राजधानी दिल्लीत हत्यांचे सत्र सुरुच आहे. श्रद्धा वालकरची तिचा लिव्ह पार्टनर आफताब पूनावालाने (aftab poonawalla) निर्घुणपणे हत्या केल्यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या पालमभागातून (delhi palam case) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. घरातल्या मुलानेच आपल्या कुटुंबाला संपवले आहे. 25 वर्षीय आरोपीने आई-वडिलांसोबत बहिण आणि आजीची निर्घुणपणे हत्या केली आहे. आरोपीला अंमली पदार्थांचे (Drugs) व्यसन होते. दररोज तो घरातून पैसे चोरायचा आणि पैसे न मिळाल्यास भांडण करायचा. धारदार शस्त्राने आरोपीने त्याच्या कुटुंबियांना संपवलं आहे. हे कृत्य केल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपीने घरातील चारही सदस्यांची हत्या केलीय. दक्षिण पश्चिम दिल्लीच्या पालम भागात हा सर्व प्रकार घडलाय. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना बहिणीचा मृतदेह एका खोलीत सापडला. आजीचा मृतदेह बेडवर तर आई वडिलांचा मृतदेह बाथरुमध्ये सापडला. पोलिसांनी हे हत्याकांड करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव केशव असल्याची माहिती समोर आली आहे. 22 नोव्हेंबरच्या रात्री पोलिसांना या घटनेची माहिती तिथल्या एका रहिवाश्याने दिली होती. फोन करणाऱ्याने वरच्या खोलीतून आवाज येत असल्याचे पोलिसांना सांगितले होते.

हत्येनंतर आरोपी पळून जाण्याच्या होता प्रयत्नात

माध्यमांच्या वृत्तानुसार केशवने आई-वडील, बहीण आणि आजीची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येनंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याला खालच्या मजल्यावरून पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून आरोपीविरुद्ध भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीकडे कसून चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार आरोपीकडे कोणतेही काम नव्हते. त्यामुळेच त्याचे नेहमीच घरात भांडण होत होते. तसेच त्याला अमली पदार्थांचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वीच तो व्यसनमुक्ती केंद्रातून परतला होता.