''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?

Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.  

Updated: Nov 23, 2022, 12:10 PM IST
''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?   title=
hypertrichosis syndrom Boy with rare werewolf has hair growing all over body

Trending News : काही लोकांच्या शरीरावर खूप केस असतात तर काहींच्या नाही. पण शरीरावर केस असणे सामान्य मानले जाते. मात्र यातही काहींच्या शरीरावर दाट तर काहींच्या चेहऱ्यावर विरळ केस असतात. मात्र भारतात असा एक मुलगा आहे ज्याच्या चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे. हा मुलगा कोण आहे आणि त्याला कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

मध्य प्रदेशातील (MP) नंदलेटा या छोट्या गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाचे नाव ललित पाटीदार (Lalit Patidar) आहे. सामान्य घरातील हा मुलगा बारावी वर्गाचा विद्यार्थी आहे. तो शेतात वडिलांची मदक करतो. घरची परिस्थिती जेमतेमच आहे. तर ललितला जन्मत:च Hypertrichosis हायपरट्रिकोसिस म्हणजेच Werewolf syndrome वेयरवोल्फ सिंड्रोम ने ग्रासलेले आहे. हा मुलगा जन्मताच असा. या सिंड्रोममध्ये हातावर आणि चेहऱ्यावर केसांची सामान्य माणसांच्या तुलनेत फार अधिक ग्रोथ दिसून येते. 

वाचा: "आफताब मला ब्लॅकमेल करायचा, 2020 मध्ये श्रद्धाने...," श्रद्धा हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा 

ललित माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मी शाळेत जातो. सुरूवातीला मला बघून लहान मुले आणि मोठी माणसे घाबरायची. त्यांना वाटायचे मी प्राणी आहे. आणि मी त्यांना चावू शकतो किंवा नुकसान पोहोचवू शकतो. माझ्या जन्माच्या वेळी डॉक्टर्सने केसांचं शेव्हिंग केलं होतं. मात्र सात आठ महिन्यानंतर माझ्या शरीरावर केसांची असामान्य वाढ दिसून येत होती. कुटुंबियांनी त्याकडे फारसे लक्षही दिले नव्हते. काही काळानंतर हे केस एवढे वाढले की लोक त्याला बंदर बंदर म्हणत चिडवत होते. मला सुद्धा सामान्य लोकांसारखे जगायचे आहे. "  

शरीरावर असामान्य पद्धतीने केस वाढणे याला Hypertrichosis हायपरट्रिचोसिस म्हणतात. हा फारच दुर्मिळ सिंड्रोम असून महिला व पुरुष दोघांनाही होऊ शकतो. यामध्ये संपू्र्ण शरीरावर केस येतात किंवा काही ठराविक भागांवर केस येतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा सिंड्रोम का होतो याचे कारण समजू शकलेले नाही.हा सिंड्रोम आनुवंशिकही असू शकतो. कुपोषण, डाएट, इटिंग डिसऑर्डर, नर्वोसा, कॅन्सर, स्टेरॉइड, औषधांचे साईड इफेक्ट यामुळे हायपरट्रिचोसिस होण्याची शक्यता असते.