Kanjhawala case : अंजली गाडीत अडकल्याचे...., कांजवाला प्रकरणात आरोपींनीच केला मोठा खुलासा

Delhi Kanjhawala Case :  दिल्लीतील कांजवाला येथे अपघातात बळी पडलेल्या अंजलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणी खुद्द आरोपीनेच मोठा खुलासा केला आहे.  

Updated: Jan 8, 2023, 03:03 PM IST
 Kanjhawala case : अंजली गाडीत अडकल्याचे...., कांजवाला प्रकरणात आरोपींनीच केला मोठा खुलासा  title=

Kanjhawala case: दिल्लीतील कांजवाला येथे अपघातात बळी पडलेल्या अंजलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत.  अंजलीची बहीण आणि काकी यांनी मीडियासमोर सांगितले की,  सुमारे सहा महिन्यांपूर्वी अंजलीला मारण्याचा प्रयत्न झाला होता. एका अज्ञाताने तिच्या स्कूटीला वाहनाने जोरदार धडक दिली. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तसेच तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिला जवळपास 15 दिवस ती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

त्यातच आता कांजवाला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने रविवारी मोठा खुलासा केला आहे. अंजली आपल्या गाडीखाली अडकली होती हे माहीत होते पण भीतीपोटी गाडी चालवत राहिल्याची कबुली त्याने पोलिसांच्या चौकशीत दिली. ती गाडीतून बाहेर निघण्याची वाट बघत गाडी फिरवत राहिल्याचे कबुली दिली आहे. त्याचबरोबर, गाडीत मोठ्याने गाणी चालू नसल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. याप्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सहा जण पोलीसांच्या अटकेत आहेत तर एकाला जामीन मिळाला आहे. तीला गाडीतून बाहेर काढले तर खुनाचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती वाटत असल्याचे आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. त्यामुळे अपघातानंतर आरोपींनी त्या तरूणीली गाडीखालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नसल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. 

आरोपीने सांगितले की, तो खूप घाबरला होता, त्यामुळे गाडी फिरवत बसला होता. त्याला कुठे जायचे काहीच सुचत नव्हते. ती तरूणी गाडी खालची निघेपर्यंत गाडी थांबवली नाही. या प्रकरणी पोलिसांनी दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा, मिथुन, मनोज मित्तल, आशुतोष आणि अंकुश अशी या आरोपींची नावे आहेत.

वाचा: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' होणार बंद? माजी दिग्दर्शकाची पत्नी म्हणाली 'शोच्या टीआरपी...

आरोपी अंकुशला मिळाला जामीन

कांजवाला प्रकरणातील सातवा आरोपी अंकुशला शनिवारी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अंकुशवर आयपीसी कलम 201/212 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यात तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. शुक्रवारीच त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. हा आरोपी तोच आहे जो संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होता. त्यातून पोलिसांची सतत दिशाभूल होत होती. या घटनेची माहिती कुणालाही मिळू नये यासाठी त्यांच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते.

नेमकं प्रकरण काय?

31 डिसेंबरच्या रात्री अंजली तिची मैत्रीण निधीसोबत स्कूटीवरून घराकडे निघाली होती. तेव्हा कांजवाला रस्त्यावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. निधी या धडकेतून वाचली, मात्र अंजली गाडीखाली अडकली. त्यानंतर कारमध्ये बसलेल्या तरुणांनी अंजलीला सुमारे 12 किलोमीटरपर्यंत ओढले. याप्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे.

अमित शहा यांनी पोलिसांकडून तपास अहवाल मागवला

अंजलीच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना तत्काळ या प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी (MHA) दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ IPS अधिकारी शालिनी सिंह यांना सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यास सांगितले.