नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Elections 2020) ७० जागांकरता (70 Seats) झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदान हे 62.69 टक्के नोंदवण्यात आले होते. एक्झिट पोलने सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल असा दावा केला आहे. गेल्या 22 वर्षांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. यावर्षी मोदींच्या मार्फत भाजप सत्तारूढ होणार का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
#DelhiResults2020: 'हे' आहेत दिल्लीतील विजयी उमेदवार
संध्याकाळी ५.१६ वाजता- ओखला मतदारसंघातून 'आप'चे अमानतउल्लाह खान विजयी
दुपारी 1:44 वाजता - भाजपला जनतेने नाकारायला सुरूवात केली आहे. दिल्लीत 100 टक्के शहरी लोकसंख्या असून सुशिक्षित वर्ग आहे. समाजामध्ये अंतर निर्माण केल्याचे दुष्कृत्य केलं. तसेच कुणल्याही राज्यकर्त्यांची जबाबदारी समाज एकसंध ठेवण्याची आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
दुपारी 1:28 वाजता - दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अपयश हा आमच्यासाठी धडा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ता आणि नेत्यांमध्ये निराशा नाही. नवनिर्माण करण्याची आशा असल्याचे काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले.
दुपारी 1:11 वाजता - भाजप खासदार गौतम गंभीरची दिल्ली निकालावर प्रतिक्रिया
दिल्ली निकाल आम्ही स्वीकारला असून अरविंद केरजीवाल यांचं कौतुक. तसेच दिल्लीच्या नागरिकांच देखील कौतुक. आम्ही आमच्याकडून पूर्ण तयारी केली होती. पण आम्ही दिल्लीच्या जनतेला म्हणणं पटवून देण्यात कमी पडलं. आशा आहे की, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मदतीने प्रगती करेल.
BJP MP from East Delhi, Gautam Gambhir: We accept #DelhiElectionResults and congratulate Arvind Kejriwal & the people of Delhi. We tried our best but, probably, we could not convince the people of the state. I hope Delhi develops under the chief ministership of Arvind Kejriwal. pic.twitter.com/GO4HG7s5fI
— ANI (@ANI) February 11, 2020
दुपारी 1:05 वाजता - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया 850 मतांनी पिछाडीवर
#DelhiElections2020: Aam Aadmi Party's Akhilesh Pati Tripathi continues to lead from Model Town assembly constituency, after sixth round of counting
— ANI (@ANI) February 11, 2020
दुपारी 1:04 वाजता - निवडणूक रणनीतितज्ञ प्रशांत किशोर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला.... आप कार्यालयात घेतील भेट
Delhi Chief Minister Arvind Kejriwal and Political Strategist Prashant Kishor at AAP party office pic.twitter.com/Lxx4fbdMM7
— ANI (@ANI) February 11, 2020
दुपारी 12:51 वाजता - प्रशांत किशोर दिल्लीच्या आपच्या कार्यालयात पोहोचले
दुपारी 12:06 वाजता - आप कार्यालयात जल्लोष..... आपची विजयाकडे वाटचाल
#Update: Aam Aadmi Party's Manish Sisodia trailing behind BJP's Ravi Negi by 1576 votes, in Patparganj assembly constituency, after fifth round of counting.
— ANI (@ANI) February 11, 2020
दुपारी 11:44 वाजता - आप कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष
Maharashtra: Aam Aadmi Party workers in Mumbai's Andheri celebrate the party's performance in #DelhiPolls2020. pic.twitter.com/gSJH8F8vkf
— ANI (@ANI) February 11, 2020
दुपारी 11:41 वाजता - दिल्लीतील जनतेने भाजपाला देशद्रोही जाहीर केलं - नवाब मलिक
दुपारी 10:42 वाजता - आप 53 जागांवर आघाडीवर तर भाजप 17 जागांवर आघाडीवर तर काँग्रेसने अद्याप खाते उघडलेलं नाही
Latest visuals from Bharatiya Janata Party Headquarters. BJP is at 18 seats and AAP is at 50 seats as per official EC trends right now pic.twitter.com/EUxnIR4vJj
— ANI (@ANI) February 11, 2020
सकाळी 10:20 वाजता - आपची 49 जागांवर आघाडी, भाजपची 21 जागांवर आघाडी तर काँग्रेसने अद्याप खातं उघडलेलं नाही
#UPDATE: Official EC trends: Aam Aadmi Party leading on 39 seats and Bharatiya Janata Party leading on 19 seats. #DelhiElectionResults https://t.co/HxZccsgD7x
— ANI (@ANI) February 11, 2020
सकाळी 10:19 वाजता - आयोगानुसार आतापर्यंतची आकडेवारी ...दिल्लीत आपला 51.07 टक्के मतदान...भाजप 40.9 टक्के मतदान...काँग्रेस 3.8 टक्के मतदान
Delhi's Chandni Chowk assembly constituency: AAP's Parlad Singh Sawhney at 6043 votes, Congress's Alka Lamba at 157 votes and BJP's Suman Kumar Gupta at 67 votes. pic.twitter.com/g8DU79hOIp
— ANI (@ANI) February 11, 2020
सकाळी 9:45 वाजता - नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पुढे ...चांदनी चौक - काँग्रेसला अलका लांबा मागे
सकाळी 9:42 वाजता - ओखलामधून भाजपचे सिंह आघाडीवर ...शाहीबाग ओखला मतदारसंघ
सकाळी 9:38 वाजता - आपचे मदललाल कस्तुरबा नगरमधून आघाडीवर
#DelhiElectionResults: Aam Aadmi Party's Madal Lal leading from Kasturba Nagar after first round of counting
— ANI (@ANI) February 11, 2020
सकाळी 9:36 वाजता - आप 50 जागांवर आघाडीवर ....भाजप 20 जागांवर आघाडीवर ....तर काँग्रेसने एकाही जागेवर खातं खोललेलं नाही
सकाळी 9:34 वाजता - काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी नाही
सकाळी 9:28 वाजता - आपचे रघुविंदर आघाडीवर
#DelhiElectionResults: Aam Aadmi Party's Raghuvinder Shokeen leading from Nangloi Jat constituency, after first round of counting of votes.
— ANI (@ANI) February 11, 2020
सकाळी 9:27 वाजता - आपचे सौरभ भारद्वाज 1505 मतांनी आघाडीवर
#DelhiElectionResults: Aam Aadmi Party's Saurabh Bhardwaj leading with a margin of 1505 votes from Greater Kailash constituency. (file pic) pic.twitter.com/ahQ2OlwqTA
— ANI (@ANI) February 11, 2020
सकाळी 9:10 वाजता - आपची 53 जागांवर मुसंडी .... भाजप 16 जागांवर आघाडीवर ...काँग्रेस केवळ 1 जागेवर पुढे
सकाळी 9:05 वाजता - मॉडल टाऊनमधून भाजपचे कपिल मिश्रा मागे...बाबरपूर आपचे गोपाल राय आघाडीवर...बल्लीमारान काँग्रेसचे हारून युसूफ पुढे
सकाळी 9:03 वाजता - बाबरपूर आपचे गोपाल राय आघाडीवर
सकाळी 8:56 वाजता - आप 54 जागेवार घाडीवर तर भाजप 15 जागांवर आघाडीवर
सकाळी 8:55 वाजता - काँग्रेसच्या अलका लांबा पिछाडीवर
सकाळी 8:50 वाजता - केजरीवाल नवी दिल्लीतून आघाडीवर
सकाळी 8:45 वाजता - पतपडगंजमधून मनीष सिसोदिया आघाडीवर
सकाळी 8:40 वाजता - आप 52 जागांवर तर भाजप 15 जागांवर आघाडीवर..... काँग्रेस अद्याप एकाच जागेवर आघाडी राखू शकलं आहे.
सकाळी 8:31 वाजता - पहिल्या अर्ध्यातासांत बहुमताचा कौल स्पष्ट.... भाजप 47 जागांवर आघाडीवर तर भाजप 15 जागांवर आघाडीवर
#DelhiElections: Counting of votes underway at Gole market counting centre pic.twitter.com/oCSuEHVLZL
— ANI (@ANI) February 11, 2020
सकाळी 8:28 वाजता - 70 जागांसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून... 20 मिनिटांतच सत्तेचा कौल स्पष्ट.... 44 जागांवर आप आघाडीवर
सकाळी 8:26 वाजता - अरविंद केजरीवालांनी केलेल्या कामाचा कौल.... काँग्रेसला दिल्लीकरांचा पाठिंबा नाही
सकाळी 8:25 वाजता - आपला मुस्लिम मतदाराचा पाठिंबा... भाजपला 41 जागांवर आघाडी
सकाळी 8:23 वाजता - आपला 40 जागांवर आघाडी, भाजप 17 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस फक्त 1 जागेवर आघाडीवर
सकाळी 8:22 वाजता - दिल्लीकर राष्ट्रवादा कौल देतात की विकासाला याकडे साऱ्यांच लक्ष
सकाळी 8:20 वाजता - आप आणि भाजपमध्ये चुरस.... आप भाजपपेक्षा तिप्पट जागांवर आघाडीवर... आप 35 जागांवर आघाडीवर
सकाळी 8:20 वाजता - आपची 34 जागांवर मुसंडी.... दिल्लीकरांचा कौल जाताना पाहायला मिळतोय
सकाळी 8:18 वाजता - जवळपास 15 वर्षे सत्तेत असलेला काँग्रेस फक्त 3 जागांवर आघाडी
सकाळी 8:14 वाजता - आपने 32 जागांवर मुसंडी तर भाजप 10 जागांवर आघाडी... आप बहुमतापासून काही चार जागा दूर.....
सकाळी 8:12 वाजता - आप 20 जागांवर आघाडी तर भाजप 7 जागांवर आघाडी
सकाळी 8: 11 वाजता - पोस्टल मतदानाचा कल हा राष्ट्रवादाच्या बाजूने... त्यामुळे भाजपला 6 जागांवर आघाडी
सकाळी 8:10 वाजता - आप 12 जागांवर आघाडी तर भाजपाला 6 जागांवर आघाडी
सकाळी 8:06 वाजता - आप पक्षाच्या कार्यात कार्यकर्त्यांची गर्दी
Delhi: Aam Aadmi Party office decked up ahead of #DelhiElectionResults. https://t.co/No8TVk27nO pic.twitter.com/KKQcdrRFNv
— ANI (@ANI) February 11, 2020
सकाळी 8:04 वाजता - महाराणी बाग येथे मतमोजणीला सुरूवात
सकाळी 8:01 वाजता - आपचे नेता आणि दिल्लीची उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मतमोजणी अगोदर घरात पूजा-अर्चा केली. तसेच त्यांनी ट्विट देखील केलं आहे.
ॐ असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मामृतं गमय।।हे ईश्वर! हमको असत्य से सत्य की ओर ले चलो। अंधकार से प्रकाश की ओर ले चलो। मृत्यु से अमरता के भाव की ओर ले चलो।
— Manish Sisodia (@msisodia) February 11, 2020
सकाळी 8 वाजता - मतमोजणीला सुरूवात झाली
Counting of votes begins, visuals from a counting centre in Maharani Bagh. #DelhiResults pic.twitter.com/PzyFNLe9Em
— ANI (@ANI) February 11, 2020
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल. मात्र, गेल्यावेळच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. याचा थेट फायदा भाजपला मिळाला आहे. तर काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: We are confident of a win today because we have worked for people in the last 5 years. https://t.co/kBIW1zRSjH pic.twitter.com/eUuiVKSsk5
— ANI (@ANI) February 11, 2020
आता सगळ्यांचे लक्ष हे निकालाकडे लागून राहिले आहे. एक्झिट पोल खरे ठरतील का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. मनोज तिवारी, अरविंद केजरीवाल यांनी सत्तेसाठी अनेक प्रयत्न केले. आता दिल्लीकरांचा कौल कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे?
#DelhiElections2020: कानपुर में आम आदमी पार्टी (AAP) के समर्थक पूजा करते हुए। दिल्ली की सभी 70 विधानसभा सीटों के लिए मतगणना आज सुबह 8 बजे से शुरू होगी। pic.twitter.com/6xSnNQT7eb
— ANI_HindiNews (@AHindinews) February 11, 2020
२०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी ६७ जागांवर 'आप'ने बाजी मारली होती. तर भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या होत्या. मात्र, यंदा अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक प्रचारामुळे भाजप दोन आकडी संख्या गाठेल, असा जाणकारांचा होरा आहे. त्यामुळे एक्झिट पोलचा हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.