acid attack in dwarka: श्रध्दा वालकर हत्या प्रकरणानंतर राजधानी महिलांसाठी किती असुरक्षित आहे याची प्रचिती देणारी आणखी एक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीतल्या द्वारका (Delhi Dwarka) परिसरात काल (14 December) धक्कादायक घटना घडली असून शालेय विद्यार्थिनीवर भरदिवसा अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अॅसिड हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. याप्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
नेमकी काय आहे घटना?
दिल्लीतल्या द्वारका (Delhi Dwarka) परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मोटरसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी बारावीच्या विद्यार्थिनीवर अॅसीड हल्ला (acid attack) केला. या हल्ल्यात विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात असून पीडित मुलीला दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अॅसिड हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. या घटनेने दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.
सचिन अरोर मुख्य आरोपी, आज कोर्टात हजर करणार
पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. आज या तिघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणाची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, या संपूर्ण घटनेचा मुख्य आरोप सचिन अरोरा (Sachin Arora) आहे. हे कृत्य करण्यासाठी सचिनने हर्षित आणि वीरेंद्र सिंह (Harshit and Virendra Singh) या आपल्या दोघ मित्रांची मदत घेतली.
वाचा: पोलीस भरतीचे अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट
अॅसिडची ऑनलाईन खरेदी (acid ordered from online flipkart)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन अरोरा आणि पीडित मुलगी रिलेशनशिपमध्ये होते. तीन महिन्यांपूर्वी या मुलीने आरोपीसोबत ब्रेकअप केलं होतं आणि त्याच्यासोबत बोलणं पूर्णत: बंद केलं होतं. यानंतर चवताळलेल्या आरोपीने मुलीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्याने अॅसिड हल्ल्याचा कट रचला. विद्यार्थिनीवर फेकण्यासाठी आरोपीने ऑनलाइन अॅसिड विकत घेतले होते. तीन आरोपींपैकी मुख्य आरोपी सचिन अरोरा याने ऑनलाइन साईट फ्लिपकार्टवरून अॅसिड मागवले होते. यासाठी सचिनने ऑनलाइन पेमेंट (online payment) केले होते.
तसेच अॅसिड हल्ला केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून मुख्य आरोपी सचिनने आणखी एक युक्ती खेळली. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने त्याच्या मित्राला स्वतःचे कपडे घालून दुचाकीवर पाठवले. त्याचे लोकेशन इतरत्र कळावे म्हणून त्याने आपला मोबाईलही त्याला दिला. मात्र, काही तासांतच पोलिसांनी त्याला पकडले.