इटालियन टूरिज्मकडून दीपिकाचा सन्मान

 बॉलिवूड अभिनेत्री सिनेमाच्या शूटिंगसाठी अनेकदा परदेशात जातात. सध्या इटलीमध्ये अनेक सिनेमांचं शूट होतं आहे. बॉलिवूडचे अनेक सिनेमे तेथे शूट केले जातात. यामुळे इटलीटा ट्रॅवेल बिझनेस वाढला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 10, 2018, 03:56 PM IST
इटालियन टूरिज्मकडून दीपिकाचा सन्मान title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सिनेमाच्या शूटिंगसाठी अनेकदा परदेशात जातात. सध्या इटलीमध्ये अनेक सिनेमांचं शूट होतं आहे. बॉलिवूडचे अनेक सिनेमे तेथे शूट केले जातात. यामुळे इटलीटा ट्रॅवेल बिझनेस वाढला आहे. 

इटॅलियन टूरिज्मकडून मुंबई ठेवण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. दीपिकाचे बचना ऐ हसीनो, हाऊसफुल हे सिनेमे इटलीमध्ये शूट झाले आहेत. ज्यामुळे इटॅलियन टूरिज्मकडून दीपिकाला अॅवॉर्ड देण्यात आला. या अॅवॉर्ड शोमध्ये दीपिका भारतीय पोशाखात पोहोचली होती.

आवडता डिजायनर सब्यसाचीच्या लाल आणि पांढऱ्या साडीमध्ये दीपिका तेथे पोहोचली होती. या शोमध्ये इम्तियाज अली यांना देखील अॅवॉर्ड देण्यात आला. संगीतकार ए आर रहमान, फिल्ममेकर साजिद नाजियाडवाला यांना देखील अॅवॉर्ड शोमध्ये बोलावण्यात आलं होतं. दीपक तिजोरी, जॅकी श्रॉफ हे देखील या या ठिकाणी पोहोचले होते.