खुशखबर! केवळ १ रूपयात विमान प्रवासाची सुवर्णसंधी

जर तुम्ही नवीन वर्षानिमित्त बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही स्वस्त हवाई यात्रेचा आनंद घेत परिवाराला खास गिफ्ट देऊ शकता. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Dec 13, 2017, 07:59 PM IST
खुशखबर! केवळ १ रूपयात विमान प्रवासाची सुवर्णसंधी title=

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन वर्षानिमित्त बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही स्वस्त हवाई यात्रेचा आनंद घेत परिवाराला खास गिफ्ट देऊ शकता. 

१ रूपयात हवाई प्रवास

भारतातील पहिली कमई बजेटची एअरलाइन एअर डेक्कन लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. या एअरलाइनकडून सुरुवातीला प्रवाशांना १ रूपयात हवाई सफर करण्याची संधी दिली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एअर डेक्कन २३ डिसेंबरपासून भारत सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत काही निवडक हवाई मार्गावरील सेवा सुरू करत आहेत. 

काय आहे प्लॅन?

या निवडक मार्गांवर काही प्रवाशांना केवळ १ रूपयांमध्ये हवाई यात्रा करवली जाणार आहे. बाकी प्रवाशांसाठीही सेवा जास्त महाग नसणार. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेनुसार केवळ १४२० रूपयांपासून तिकीटीचे दर असतील. एअर डेक्कनची स्थापना २००३ मध्ये कॅप्टन जीआर गोपीनाथ यांनी केली होती. एअर डेक्कन कमी पैशात प्रवास देण्यासाठी प्रसिद्ध होती. 

किंगफिशरमध्ये विलीनिकरण

२००८ मध्ये एअर डेक्कन ही कंपनी किंगफिशरमध्ये मर्ज झाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये किंगफिशरच्या आर्थिक अडचणीमुळे कंपनी बंद पडली. पण आता डेक्कन एअर पुन्हा एअरलाइन विश्वात परत येत आहे. यांची सेवा २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 

कुठून कुठे सेवा?

डेक्कन एअरने दिल्ली, मुंबई, कोलकातामध्ये आपले बेस तयार केले आहे. सुरूवातीला मुंबई ते नाशिक, नाशिक ते पुणे आणि मुंबई ते जळगावसाठी रिटर्न फ्लाईट सेवा सुरू केली जाणार आहे. या स्कीमचा फायदा तुम्ही १० जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत घेऊ शकता

लवकरच इथेही सेवा

मीडिया रिपोर्टनुसार, डेक्कन एअर लवकरच मुंबई ते कोल्हापूर, सोलापूर. कोलकाता ते जमशेदपूर, राऊरकेला, दुर्गापूर, बागडोगरा, बर्नपुर, कूच बेहर, अगरतला, शिलॉंग ते इंफाल, दीमापूर, आईजोल, अगरतला. आणि दिल्ली ते शिमला, लुधियाना, पंतनगर, देहरादून आणि कुल्लूसाठी बुकींग सुरू होईल.