बॅंक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढली

आपला १२ अंकी आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करण्याची अंतिम तारीख आता वाढली आहे. 

Updated: Dec 13, 2017, 07:26 PM IST
बॅंक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढली title=

नवी दिल्ली : आपला १२ अंकी आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करण्याची अंतिम तारीख आता वाढली आहे. याआधी आधार क्रमांक बॅंक खात्याशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर देण्यात आली होती. पण अनेकांना अजूनही ते शक्य न झाल्याने आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. 

कधीपर्यंत मुदत वाढवली?

ज्यांनी अजूनही आपल्या बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक केला नाही त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आधी ३१ डिसेंबरला ही मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत देण्यात आली आहे. सरकारने १३ डिसेंबरला याची घोषणा केली.

बंदीच्या याचिकेवर सुनावनी 

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने बुधवारी सांगितले की, ५ न्यायाधीशांचे पीठ सरकारी योजना आणि कल्याणकारी योजनांना आधार जोडणे अनिवार्य या सरकारच्या निर्णयावर बंदी घालण्याच्या याचिकेवर गुरूवारी सुनावनी केली जाणार आहे.