'अशी मुलं फक्त बिलं भरण्यासाठी असतात,' महिलेने सांगितली तरुणांना लुटण्याची आयडिया, नेटकरी म्हणाले 'हेच जर मुलाने....'

एका महिला इन्फ्लूएन्सरने इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर करत महागड्या क्लबमध्ये तरुणांना बिल भरायला लावण्याची कल्पना समजावून सांगितलं आहे. दरम्यान या व्हिडीओवरुन वाद निर्माण झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 12, 2024, 12:38 PM IST
'अशी मुलं फक्त बिलं भरण्यासाठी असतात,' महिलेने सांगितली तरुणांना लुटण्याची आयडिया, नेटकरी म्हणाले 'हेच जर मुलाने....' title=

सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ वाद निर्माण करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन वाद निर्माण होण्याचं कारण म्हणजे, त्यात एका तरुणीने इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सरने कशाप्रकारे महागड्या क्लबमध्ये तरुणाला बिल भरायला लावावं हे समजावून सांगितलं आहे. 

तरुणी व्हिडीओत सांगत आहे की, "सर्वात आधी जुगाड करुन एका महागड्या क्लबमध्ये प्रवेश करा. यावेळी चारही बाजूंना पाहिल्यानंतर आपलं टार्गेट ठरवा. त्याने तुमच्याकडे पाहिल्यानंतर दुर्लक्ष करा. नंतर अॅटीट्यूड दाखवत त्याच्याकडे पाहा, जेणेकरुन तो तुमचं सौदर्य पाहू शकतो. त्याला आपण चमन छपरी आणि तुम्ही मडोना आहोत असं वाटला पाहिजे. तुमचा टार्गेट जाळ्यात अडकलं आहे". 

पुढे ती सांगते की, "आता हळूच तुमचा परफ्यूम त्याच्यावर मारुन तेथून निघून जा. नंतर अशा जागी जावून लपा जेथून तो तुम्हाला पाहू शकत नाही, पण तुम्हाला तो दिसेल. जर तो वेड्याप्रमाणे तुम्हाला शोधत असेल तर याचा अर्थ तो जाळ्यात अ़डकला आहे. नंतर मित्रांना बोलवा ड्रिंक मागवा आणि पार्टी सुरु करा कारण बिल तर टार्गेट देणार आहे. बोनस टीप  - अशी मुलं फक्त बिल देण्यासाठी असतात, ह्रदय देण्यासाठी नाही".

तसं तर हा व्हिडीओ मजेशीर अंदाजात बनवण्यात आला आहे. पण काही नेटकऱ्यांना हे रुचलेलं नाही. @ruchikokcha नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ ट्वीट करत त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "ही प्रियंका त्यागी आहे. ही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असून इंस्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. आपलं बिल भरण्यासाठी तरुणाला जाळ्यात कसं ओढावं हे ती सांगत आहे. या रिलला 4.3 मिलियन व्ह्यूज आहेत".

"जर एखाद्या मुलाने अशा प्रकारचा व्हिडीओ पोस्ट केला असता तर किती वाद झाला असता विचार करा. आपल्या कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत ज्यामध्ये असं कृत्य करणाऱ्या पुरुषांविरोधात अनेक गुन्हे दाखल करु शकतात. पण अशा महिलांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी काही तरतूद नाही, जे पुरुषांना जाळ्यात ओढून पैसे लुटतात. समान कायद्याची वेळ आता आली आहे," असंही तिने म्हटलं आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत.