Crime News : 20 वर्षीय तरुणी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होती. मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमधील संस्कृत महाविद्यालयातील महिला प्राध्यापकाचा 18 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. महिलेची 20 वर्षांची मुलगी मृत्यूच्या वेळी दिल्लीत होती. तिथे ती यूपीएससीची तयारी करत होती. आईच्या मृत्यूची बातमी ऐकून ती त्याच दिवशी इंदूरला आली आणि पोलिसांना शवविच्छेदन करण्यास सांगितले. त्याचे म्हणणे ऐकून घरच्यांनी विरोध केला. कुटुंबीयांनी तिच्या दोन लहान बहिणींनाही पोलिसांना जबाब देण्यास मनाई केली. (Daughter investigates mothers death punishes father marathi crime news)
वीस वर्षीय मुलीने सांगितले की, अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी माझ्या वडिलांना बोलावले आणि नंतर त्यांना सोडून दिले. बरोबर दोन दिवसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आला. महिलेचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. मुलीने सांगितले की, मी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली, परंतु पोलिसांनी माझी गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. तिच्या वडिलांनी तिला विष देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मुलीने सांगितले.
मुलीने सांगितले की, ज्या दिवशी माझी आई वारली, त्या दिवशी माझ्या वडिलांनी तिच्यासाठी जेवण बनवले होते. ते अन्न फक्त माझ्या आईनेच खाल्ले होते. दुपारी आईची प्रकृती बिघडली. तिला माझ्या धाकट्या बहिणीला फोन करून काहीतरी सांगायचे होते. मात्र प्रकृती ढासळल्याने ती काही बोलू शकली नाही. मुलीने सांगितले की, यानंतर माझे वडील आईसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी छातीत दुखत असल्याचं डॉक्टरांना सांगितले. मी हॉस्पिटलमधून सर्व कागदपत्रे घेतली, माझ्या आईला उलट्या होत असल्याचे स्पष्ट झाले. मी त्यांचे कपडेही पाहिले ज्यावर त्यांनी उलट्या केल्या होत्या. मुलीने तिच्या वडिलांवर माझ्या आईच्या फोनमधील सर्व डेटा डिलीट केल्याचा आरोप केला आहे. मुलीने हे सर्व पुरावे इंदूर पोलिसांना दिले. चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेचा व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर त्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. मृत्यूचे कारण काय होते हे व्हिसेरा रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तिचे वडील नेहमी आईचा छळ करत होते, अशी तक्रार मुलीने पोलिसांत केली आहे. माझ्या आईला मुलगा नसल्यामुळे ते असं करायचे, आम्ही तीन बहिणी आहोत. मुलीने सांगितले की, माझ्या वडिलांना भ्रष्टाचारप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. माझे आई-वडील वेगळे राहत होते, असं असूनही ते माझ्या आईकडे येऊन तिला त्रास द्यायचे.
एप्रिलमध्ये मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, तिचा पती तिला मारहाण करत असे. पतीने माफी मागितल्याने महिलेने नंतर तक्रार मागे घेतली होती. मुलीच्या सतर्कतेपणामुळे मुलीने तिच्या आईच्या हत्येचा छडा लावला.