तुमकुरू : डॉक्टर (Doctor) आणि रूग्णालय (Hospital) प्रशासनाच्या निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. प्रेग्नेंट महिलेकडे (Pregnant women) आधार कार्ड नसल्याने तिला घरी पाठवल्याची निंदनीय घटना घडली आहे. या घटनेनतर घरी गेलेल्या प्रेग्नेंट महिलेसोबत जे घडलं ते एकूण संपुर्ण गावाला धक्का बसला आहे. या घटनेनंतर आरोग्य मंत्र्यांनी संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली.
या घटनेत कस्तूरी नामक गर्भवती महिलेला (Pregnant women) प्रसुती वेदना होत होत्या. त्यामुळे शेजाऱ्यांनी तिला ऑटोरिक्षातून बसवून जिल्हा रूग्णालयात (District Hospital) अॅडमीट होण्यासाठी पाठवले होतो. मात्र डॉक्टर आणि रूग्णालय प्रशासनाने (District Hospital) तिच्याजवळ आधार किंवा प्रसूती कार्ड उपलब्ध नसल्यामुळे तिला अॅडमीट करून घेण्यास नकार दिला होता. ज्यामुळे तिला पुन्हा घरी जावे लागले होते.
गर्भवती कस्तूरी (Pregnant women) घरी पोहोचताच तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. या प्रसुती दरम्यान तिने दोन बाळाला जन्म दिला. या बाळाला जन्म देताना तिचा दुदैवी मृत्यू झाला. तसेच थोड्या वेळाने दोन्ही बाळांचाही मृत्यू झाला. ही घटना एकूण अनेकांना मोठा धक्का बसला होता. डॉक्टर आणि रूग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा आणि तिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला.
या घटनेवर शेजारी म्हणाले की, घरी परतल्यानंतर कस्तुरीच्या प्रसूती (Pregnant women) वेदना तीव्र झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, दुसऱ्या मुलाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर काही वेळातच तिच्या पहिल्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या मुलाचा देखील मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी पुढे सांगितले की, कस्तुरीला सहा वर्षांची मुलगीही आहे. भारतीनगर येथील एका घरात ती दुसऱ्या मुलीसोबत राहत होती. महिलेचा पती दुसरीकडे राहत होता,अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान या घटनेनंतर नागरीक चांगलेच संतप्त झाले आहेत.या नागरीकांनी संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी तीन प्रभारी परिचारिका आणि एक ऑन ड्युटी डॉक्टरला निलंबित केले आहे.
कर्नाटकच्या (karnatak) तुमकुरू जिल्ह्यात ही घटना घडलीय आहे. या घटना एकूण अनेकांना धक्का बसला आहे.