Crime News : प्रत्येक आई-बापाला आपलं मुल आपल्या जीवापेक्षाही प्रिय असतं. मुलाला जरासही लागलं तरी आईच्या डोळ्यात पाणी येतं. त्यातच एकुलता एक मुलगा असेल तर त्याला कुठे आणि कुठे नको, असं आई-वडिलांना वाटत असतं. पण तोच मुलगा जर आई-बापाला डोईजड झाला तर. अशीच एक धक्कादायक समोर आली. आई-बापाने आपल्या लाडक्या आणि एकुलत्या एक मुलाच्या हत्येची सूपारी देऊन त्याची हत्या घडवून आणली. (Parents got their son murdered)
काय आहे नेमकी घटना?
हैदराबादलमधल्या (Hyderabad) तेलंगणातल्या (Telangana) खम्मम जिल्ह्यातली ही धक्कादायक घटना आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळून आई-बापानेच मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाचे वडिल एका सरकारी शाळेत प्रिन्सिपल आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आपल्या एकुलता एका मुलाची हत्या करण्यासाठी 8 लाखांची सुपारी दिली. आरोपींनी मुलाचा गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी मृत मुलाचे वडिल क्षत्रिय राम सिंह आणि आई राणीबाई यांच्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
मुलाची हत्या का केली?
क्षत्रिय राम सिंह आणि राणीबाई यांनी मोठ्या लाडाने आपल्या एकुलत्या एक मुलाचं पालनपोषण केलं. त्याचे सर्व लाड पूरवले. पण तोच मुलगा हाताबाहेर गेला. मुलाला दारूचं व्यसन लागलं. दिवसाढवळ्या दारू पिऊन तो आई-वडिलांना मारहाण करत होता. त्यातच तो बेरोजगार होता. दररोजच्या त्रासाला आई-वडिल वैतागले होते. त्रास असहाय्य झाल्याने आई-वडिलांनी त्याला कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एका टोळीला 8 लाक रुपयांची सुपारी दिली.
कारमुळे झाला हत्येचा उलगडा
मुलाच्या हत्येनंतर पोलिसांनी अनेक सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं. यात हत्येच्यावेळी वापरण्यात आलेल्या कारची माहिती मिळाली. याच कारमध्ये मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. मुलाग बेपत्ता झाल्यानंतरही आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल न केल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. धक्कादायक म्हणजे मुलाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जेव्हा पोलिसांनी आई-वडिलांना बोलावलं. तेव्हा याच कारने ते पोलीस स्टेशनला गेले होते. त्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं.
मुलाच्या मामाने रचला हत्येचा कट
मृत मुलाची आई राणीबाई हिने मुलाची हत्या करण्यासाठी आपल्या भावाकडे म्हणजे मुलाचा मामा सत्यनारायण याच्याकडे मदत मागितली. सत्यनारायणने कट रचला आणि पैसे देऊन चार जणांना आपल्या कटात सहभागी करुन घेतलं. यासाठी आरोपींना दीड लाख रुपये आधी आणि हत्या केल्याच्या तीन दिवसांनी उरलेले साडेसहा लाख देण्याचं ठरवण्यात आलं. ठरल्यानुसार 18 ऑक्टोबरला सत्यनारायणला कारमध्ये बसवून कल्लेपल्ली इथे नेण्यात आलं. तिथे त्याला दारू पाजण्यात आली त्यानंतर कारमध्येच त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली.