लज्जास्पद घटना! मामाकडून 14 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्यार; मामीने तिला घरी आणलं अन्...

Crime News Maternal Uncle Sexually Harass Niece: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारी रोजी शाळेला सुट्टी असल्याने मुलगी गावातील एका कार्यक्रामध्ये भोजनासाठी गेली होती. घरी येताना तिला वाटेत तिची मामी भेटली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2024, 11:36 AM IST
लज्जास्पद घटना! मामाकडून 14 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्यार; मामीने तिला घरी आणलं अन्... title=
आरोपीला पोलिसांनी केली अटक

Crime News Maternal Uncle Sexually Harass Niece: मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. येथील एका इसमाने आपल्याच 14 वर्षीय भाचीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. मुलताई तालुक्यातील एका गावामध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मामाविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यानिमित्त सुट्टी होती. ही मुलगी गावामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये जेवायला गेली होती. कार्यक्रमाला हजेरी लावून जेवण करुन घरी जात असताना या मुलीला रस्त्यात तिची मामी भेटली. ही मुलगी मामीबरोबर त्यांच्या घरी गेली. घरी पोहोचल्यानंतर थोड्याच वेळाने मामी घराबाहेर गेली. त्यावेळेस घरी पीडित मुलगी आणि तिचा मामाच होता. या वेळी या नराधमाने आपल्याच 14 वर्षीच्या भाचीचे लैंगिक शोषण केले. 

वैद्यकीय तपासणीत समोर आलं सत्य

लैंगिक अत्याचार झाल्यानंतर कशीबशी ही मुलगी या नराधमाच्या तावडीतून सुटली आणि स्वत:च्या घरी आली. तिने घरी आल्यावर संपूर्ण घटनाक्रम आईला सांगितला. थोड्याच वेळात या पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर काही कारणाने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. वैद्यकीय तपासणीमध्ये या मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णायात येऊन या मुलीचा जबाब नोंदवला. पोलिसांनी आऱोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मामीचाही हात होता का?

पोलिसांनी वैद्यकीय चाचणीनंतर मुलीवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झाल्याने लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसेच हा अत्याचार नियोजित पद्धतीने करण्यात आला का? या संदर्भातील पूर्वकल्पना मुलीच्या मामीला होती का? हा कट मामा आणि मामीने मिळून रचलेला का यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणामधील पीडित मुलीचं समोपदेशनही सुरु केलं आहे.