अरे देवा! म्यूझिक कॉन्सर्ट सुरू असताना अचानक लाइट गेली अन् 72 मोबाइल लंपास

Music Concert : सनबर्न फेस्टिव्हल सुरू होते, नेदरलँडच्या कलाकारांची संगीत मैफल रंगली होती, 10 हजार लोक जमली अन् अचानक बत्तीगुल झाली आणि मग...

Updated: Oct 11, 2023, 03:48 PM IST
अरे देवा! म्यूझिक कॉन्सर्ट सुरू असताना अचानक लाइट गेली अन् 72 मोबाइल लंपास title=
Crime News gurugram sunburn festival music concert at involved power failure 72 mobile stolen

Music Concert : सनबर्न फेस्टिव्हलमध्ये नेदरलँडचे कलाकारांची संगीत मैफल रंगात आली होती. 10 हजार प्रेक्षक या सोहळ्याचा आनंद घेत होती. मैफली अगदी रंगात आली असताना अचानक लाइट गेली. ते तिघ व्हीआयपी लेनमध्ये होते. रात्रीचे 8.20 वाजता त्यांच्यापैकी एकाने तिचा मोबाइल दिसत नाही म्हणून सांगितलं. अंधारात दुसऱ्याने स्वतःच्या फ्लॅश लाइटने मोबाईलची शोधाशोध सुरु झाली. पण तो काही केला दिसत नव्हता. अवघ्या 10 मिनिटांनंतर अजून एका व्यक्तीचा फोन नाहीसा झाला. अन् हे काय बघता बघता त्या अंधारात 72 जणांचे मोबाईल लंपास झाले. (Crime News gurugram sunburn festival music concert at involved power failure 72 mobile stolen)

हा धक्कादायक प्रकार गुरुग्राममधील सेक्टर 59 मधील बॅकयार्ड स्पोर्ट्स क्लबमध्ये सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोबाईल हरवल्याचा तक्रार नोंदवून घेतली आहे. डीसीपी दक्षिण सिद्धांत जैन यांनी सांगितलं की, सेक्टर 65 पोलीस ठाण्यात रात्री उशिरा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार आली. 

नोएडामध्ये राहणाऱ्या हिमांशू विजय सिंह यांनी सांगितलं की, या म्यूझिक कॉन्सर्टमध्ये त्यांचा आणि त्यांची पत्नी अवंतिकाचा मोबाईल फोन चोरीला गेला. या दोघांशिवाय लक्ष्य रावल, अर्जुन कचरु, सौम्या ज्योती हलदर, सार्थक शर्मा आणि करण चौहान यांचेदेखील फोन गायब झाले. 

एवढ्या मोठ्या संख्येत मोबाईल चोराला गेल्यामुळे पोलिसांची सूत्र हलली आणि त्यांनी 12 आरोपींची धरपकड केली. त्यांच्याकडून दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित करुन त्यांनी या अंधारात प्रेक्षकांचे मोबाईल गायब केले. या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारे चोरी केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.