मुंबई : आयकर विभागाने सध्या छापांचा धडाका लावला आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांच्या घरी ईडी छापा मारत आहे. अशावेळी आयकर विभागाच्या एका पथकाने एका व्यापाराच्या घरावर छापा टाकला. महत्वाचे म्हणजे व्यापाराच्या घरी आयकर अधिकाऱ्यांना चक्क पैशांचे घबाड सापडले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन मागवण्यात आली. संबंधित ठिकाण्यांवर सुरु असलेल्या छापेमारीत जवळपास 150 कोटी रुपये किमतीच्या नोटा सापडल्याचं बोललं जातं. आणि अजून नोटा मोजल्या जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
आयकर विभागाने कन्नौजमधील एका घरावर छापा मारला. या छापेमारीत पैसे जप्त केले असून हे घर परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांचे आहे. ज्याने नुकतेच समाजवादी परफ्युम लाँच केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार नोट मोजणी मशीन कानपूरमध्ये आणण्यात आल्या असून रात्री उशिरापर्यंत पथके तपास करत आहेत.
आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले असून, व्यावसायिकाकडे सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी विभागाला चार मशीन मागवाव्या लागल्या. या व्यावसायिकाच्या दोन कंपन्या अरब देशांमध्ये आहे. तर सहा कंपन्या भारतातच नोंदणीकृत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाचे निवासस्थान कानपूरमध्ये असून कन्नौजमध्ये परफ्युमचा व्यवसाय आहे. तर व्यवसायाचे प्रमुख केंद्र मुंबई आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मारलेल्या छापा एवढी रोकड रक्कम मिळाली की, अधिकाऱ्यांना पैसे मोजण्यासाठी मिशन मागवावी लागली. रात्री एकाचवेळी 4 पैसे मोजणारी मशिन मागवावी लागली.
पियुष जैन हे मोठे उद्योगपती आहे. महत्वाच म्हणजे ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळचे आहेत. प्राप्तिकर विभागाने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. तेथे काय सापडले आणि किती रोकड सापडली. मात्र निवडणुकीच्या वर्षात सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांवर छापा टाकल्यानंतर पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. आयकर विभागाला तेथे मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली आहे.