मुंबई : लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात आज स्थिरता दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होतेय. आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. गुरूवारी (23 डिसेंबर) मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
एमसीएक्स MCX
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याचे दर प्रती तोळे 48155 रुपये इतकी ट्रेड करीत होती. तर चांदीचे दर 62245 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.
22 कॅरेट सोन्याची किंमत
23 डिसेंबर रोजी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,300 रुपये प्रति तोळे होती. त्याच वेळी, आजही 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,300 रुपये प्रति तोळे आहे.
चांदीच्या किमती
कालपर्यंत जी चांदी 62,300 रुपये किलोने विकली जात होती, ती आज मुंबईत 62,400 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.
24 कॅरेट सोने आलिशान असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
मिस्ड कॉल देऊन सोन्याचा दर जाणून घ्या
तुम्ही घरबसल्या सहज सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.
भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.
-
(वरील सोने - चांदीचे दर कोणतेही कर वगळून नोंदवण्यात आले आहेत. स्थानिक बाजारपेठेनुसार त्यात बदल होऊ शकतो)