मुंबई : पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबते वाढत आहेत. दरम्यान, क्रिकेटपटू हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून एक फोटो जारी केला आहे. या फोटोमध्ये सिद्धू आणि हरभजन दोघेही हसत हसत एकत्र उभे आहेत. सिद्धूने ट्विटमध्ये लिहिले, 'चमकदार स्टार भज्जीसोबत. हे चित्र अनेक शक्यतांनी भरलेले आहे.
सिद्धूंच्या ट्विटवर हरभजनचे मौन
सिद्धूंच्या (Navjot Singh Sidhu) या ट्विटने राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. असे मानले जात आहे की येत्या काही दिवसांत हरभजन याबाबत घोषणा करू शकतो. मात्र, तूर्तास त्याने सिद्धूच्या ट्विटवर मौन पाळले आहे.
Picture loaded with possibilities …. With Bhajji the shining star pic.twitter.com/5TWhPzFpNl
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 15, 2021
पंजाबमध्ये पुढील वर्षी निवडणुका
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात लढत असणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चरणजीत सिंग चन्नी सध्या पंजाबमधील काँग्रेस सरकारचे नेतृत्व करत आहेत. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या एसएडीने बसपाशी हातमिळवणी केली आहे. भाजप आणि कॅप्टन अमरिंदर यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष युतीच्या शक्यता तपासत आहे. तर आम आदमी पक्ष सध्या निवडणुकीच्या रिंगणात एकटा पडला आहे.