नवी दिल्ली : जर तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल. तर तुम्ही लस कधी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी सूचना केल्या आहेत. सरकारच्या पॅनलने सांगितले आहे की, कोव्हिड 19 पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्यानंतर 6 महिन्यांनी लस घ्यावी.
देशभरात लसीकरण कार्यक्रमात सुरू आहे. कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांचा फोकस लसीकरणावर आहे. परंतु लशीच्या तुटवड्यामुळे 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण अपेक्षेप्रमाणे होऊ शकत नाहीये.
त्यामुळे सरकारच्या तज्ज्ञांच्या समितीने कोव्हिड 19 पॉझिटिव्ह रुग्णांनी बरे झाल्यानंतर 6 महिने लस घेऊ नये असे सूचवले आहे.
Govt panel recommends those testing positive for COVID-19 should defer vaccination for six months after recovery:sources
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2021