कोलकाता : तृणमूल कॉंग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचे रुग्णालयात निधन झाले. त्याना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांनतर घोष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमदार तमोनाश घोष यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ममता यांनी ट्वीट केले, 'खूप दु:खद घटना आहे. फाल्टा येथून तीन वेळा ते आमदार म्हणून निवडणू आले आहेत. १९९८ पासून पक्षाचे ते कोषाध्यक्ष आहेत. तमोनाश घोष हे आम्हाला सोडून गेले आहेत. गेली ३५ वर्षांपासून ते लोकांसाठी आणि पक्षासाठी एकनिष्ठ काम करीत होते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून खूप योगदान दिले.
Very, very sad. Tamonash Ghosh, 3-time MLA from Falta & party treasurer since 1998 had to leave us today. Been with us for over 35 years, he was dedicated to the cause of the people & party. He contributed much through his social work. (1/2)
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 24, 2020
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कधीही भरुन निघणार नाही. आमच्या सर्वांच्यावतीने आम्ही त्यांची पत्नी झराना, त्याच्या दोन मुली, मित्र आणि हितचिंतकांबद्दल मनापासून सहानुभूती व्यक्त करतो.