मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पुन्हा डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. सलग १८ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली असून यामुळे ग्राहकांवर बोझा पडत आहे. दरम्यान, दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम होता. तर डिझेलमध्ये ४८ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या आहेत. आज दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे
तेल कंपन्यांनी गेल्या १८ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत सुमारे ८.५० रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर, गेल्या १८ दिवसांत डिझेल १०.२५ रुपयांनी महाग झाले आहे. मात्र, महिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. दरम्यान, पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत.
Petrol and diesel prices at Rs 79.76/litre (no increase) and Rs 79.88/litre (increase by Rs 0.48), respectively in Delhi today. pic.twitter.com/ojKPS2XzfU
— ANI (@ANI) June 24, 2020
पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाल्याने मोठा फटका बसणार आहे. तसेच महागाईला निमंत्रण मिळाले आहे. डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली.
आज डिझेल सरासरी ४५ ते ५० पैशांनी महागले आहे. तर पेट्रोलच्या भावात मात्र कोणतीही वाढ झाली नाही. बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपयांवर स्थिर आहे. तर डिझेल ७८.२२ रुपये झाला आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत ४६ पैशांची वाढ झाली. मंगळवारी मुंबईत डिझेल ७७.७६ रुपये होते.
दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम होता. तर डिझेलमध्ये ४८ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या आहेत. आज दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे. कोलकातामध्ये आज पेट्रोल ८१.४५ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोलने ८३.०४ रुपयांवर कायम आहे. कोलकातामध्ये डिझेल ७७.०६ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७७.१७ रुपये झाले.