Coronavirus : मुंबईत कोरोनाची सुपरफास्ट वाढ; देशातही रुग्णवाढीचा विस्फोट

Coronavirus :1 एप्रिलला मुंबईत 189 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 21 आहे.  कोरोनासोबतच H3N2 च्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन महापालिका प्रशासनानं केले. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. 

Updated: Apr 2, 2023, 11:35 PM IST
Coronavirus : मुंबईत कोरोनाची सुपरफास्ट वाढ; देशातही रुग्णवाढीचा विस्फोट title=

Coronavirus News : मुंबईकरांनो (Mumbai) तुम्ही जर कोरोनाचे नियम पाळत नसाल तर सावधान. कारण, फक्त दोन महिन्यांतच मुंबईत झालेली कोरोनाची वाढ धडकी भरवणारी आहे. राज्यात आज कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 562 नव्या रुग्णांची नोंद झाले आहेत. 395 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत (Coronavirus News). 

24 जानेवारी 2023 ला मुंबईत शून्य कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तब्बल तीन वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र, फक्त दोन महिन्यांतच ही परिस्थिती बदलली. 

1 एप्रिलला मुंबईत 189 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 21 आहे.  कोरोनासोबतच H3N2 च्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन महापालिका प्रशासनानं केले. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. 

देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय 

देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात कर्नाटक,पंजाब आणि दिल्लीतल्या प्रत्येकी दोघांचा समावेश आहे तर गोव्यातला एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण वाढ ही केरळमध्ये झाली आहे. तिथे 24 तासांमध्ये 523 नवे रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या 15 हजार 208 सक्रिय रुग्ण आहेत. तेव्हा मास्क वापरा, गर्दीत जाऊ नका आणि नियम पाळा असं आवाहन सरकारनेही केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला

मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे. महानगरपालिकेने शहरातील दोन रूग्णालयांसह 3 ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. टास्कफोर्सने शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व रूग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या धरतीवर मुंबई महापालिकेने आढावा बैठक घेतली. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि आणखी एका ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरू करण्यात येईल. तसंच दुबई चीनमधून येणा-यांची चाचणी बंधनकारक करण्यात आलीय.  कोरोना चाचणी सकारात्मक येण्याच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ झालीय.  डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रुग्णालयामध्ये मास्कचा वापर  बंधनकारक करण्यात आला आहे.