कोरोना रिटर्न : तामिळनाडूत Lockdown वाढवला, या राज्यतही नाइट कर्फ्यू

कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन (Lockdown) आणि (Night Curfew) नाईट कर्फ्यू सारखी कठोर पावले उचलावी लागली आहेत.  

Updated: Mar 1, 2021, 10:39 AM IST
कोरोना रिटर्न : तामिळनाडूत Lockdown वाढवला, या राज्यतही नाइट कर्फ्यू  title=

मुंबई : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन (Lockdown) आणि (Night Curfew) नाईट कर्फ्यू सारखी कठोर पावले उचलावी लागली आहेत. तामिळनाडूने (Tamil Nadu) 31 मार्चपर्यंत राज्यव्यापी लॉकडाऊन वाढविला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि गुजरात (Maharashtra and Gujarat) यांनीही काही जिल्ह्यांमध्ये कडक पावले उचलत लॉकडाऊन वाढविला आहे. या दोन्ही राज्यांत कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संबंधित राज्यांनी लोकांना अधिक जागरुक राहण्याचे आणि मास्क वापरावे असे आवाहन केले आहे.

गुजरातमधील या शहरांमध्ये निर्बंध

गुजरात सरकारने अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोट या चार मोठ्या शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी 15 दिवसांसाठी वाढविली आहे. यापूर्वी हा कर्फ्यू 28 फेब्रुवारीला संपणार होता. गेल्या काही दिवसात इथल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या घटनांमध्ये जोर वाढला आहे. सरकार परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कठोर उपाययोजना राबविण्यावर भर देत आहे. जेणेकरून परिस्थिती पूर्वीसारखी उद्भवू नये याची काळजी घेण्यात येत आहे.

महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास, अमरावती आणि अचलपूर शहरातील लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्यात आले आहे. नागपूर, बुलढाणा आणि यवतमाळ येथेही आठवड्याचे शेवटचे दिवस म्हणून काही निर्बंध घातले गेले आहेत, तर अचलपूरला लागूनच असलेल्या अंजनगाव सुरजी शहरही 8 मार्चपर्यंत बंद राहील. तसेच हिंगोली शहरात 7 मार्चपर्यंत कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

शाळा-महाविद्यालयही बंद 

महाराष्ट्रात शनिवारी 8000 पेक्षा जास्त नवीन कोविड -19ची प्रकरणे नोंदली गेली. यासह एकूण कोरोना बाधितांची संख्या 21,46,777 वर पोहोचली आहे. राज्यात मृत्यूची संख्याही वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 52,092 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालये आणि खासगी प्रशिक्षण केंद्रांनाही 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला. यावेळी जनतेला आवश्यक गरजा सोडल्याशिवाय अनावश्यकपणे बाहेर जाऊ दिले जाणार नाही.

या 5 राज्यांत सर्वात वाईट स्थिती

दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की शनिवारी भारतातील एकूण कोविड -19च्या रुग्णांची संख्या 1,64,511 पर्यंत वाढली आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात यांचे सर्वाधिक योगदान आहे. या राज्यात संक्रमणाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, कोरोना लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे म्हणजे 1 मार्चपासून. त्याअंतर्गत आता 60 वर्षे वयोगटातील लोकांना लस डोस दिला जाईल. या व्यतिरिक्त ज्यांचे वय 45 वर्षे आहे अशा लोकांना देखील लसीकरण केले जाईल ज्यांना आधीच मोठा आजार आहे.