मुंबई : देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता उत्तर प्रदेशात आजी-माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाला आहे. (Coronavirus in Uttar Pradesh) उत्तर प्रदेश राज्यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा वाढत आहे. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. (Chief Minister Yogi Adityanath Tested Corona Positive) तसेच माजी मुखयमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनाही कोरोनाची बाधा झाला आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण क्वारंटाईन झालो आहोत, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. याआधी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशात एकाच दिवशी दोन मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
शुरुआती लक्षण दिखने पर मैंने कोविड की जांच कराई और मेरी रिपोर्ट पॉजिटिव आई है।
मैं सेल्फ आइसोलेशन में हूं और चिकित्सकों के परामर्श का पूर्णतः पालन कर रहा हूं। सभी कार्य वर्चुअली संपादित कर रहा हूं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 14, 2021
दरम्यान, राज्यातील सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सामान्य स्थितीत सुरु आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.