Coronavirus Guidelines In India : चीन, जापान आणि अमेरिकेसोबत अनेक देशांमध्ये कोरोनाची (Corona cases) प्रकरणं वाढताना दिसतंय. असं असताना भारत सरकार (India Government) देखील अलर्टवर आलंय. चीनमध्ये दिसून येणारी अधिकतर प्रकरणं ही ओमायक्रॉनचा बीएफ 7(BF7) या व्हेरिएंटची आहे. ही बाब लक्षात घेता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (mansukh mandaviya) यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यासोबत बैठक घेतली.
या बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे.
राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, टेस्टिंग, उपचार आणि ट्रेसिंग यांच्यावर अधिक जोर देण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यातील सर्व नागरीकांनी प्रिकॉशनरी म्हणजेच बूस्ट डोस घ्यावा, याकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.
लोकांना मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग ठेवण्याबाबत देखील सांगण्यात आलंय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठकही घेतली होती. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सुचना दिल्या होत्या.
भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळलेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जातेय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावलीय. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीया यांनी गुरुवारी राज्यसभेत भारतातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.
कोरोनाचा नवा व्हेरियंट उघड झाल्यावर आता बूस्टर डोससाठी गर्दी वाढली आहे. कोविनवर बूस्टर डोस घेण्यासाठी वेगाने रजिस्ट्रेशन सुरु आहे. गुरूवारी 7 वाजेपर्यंत बूस्टर घेण्यासाठी12 हजारहून अधिक जणांनी रजिस्ट्रेशन केलं. गेल्या 27 दिवसांत 50 हजारहून अधिक जणांनी बूस्टर डोस घेतला. दरम्यान, मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता कमीच आहे. अशी सूत्रांची माहिती आहे. कोरोनाबाबत लोकांमध्ये पुरेशी जनजागृती झालीय. त्यामुळे केवळ नियमावली जारी केली जाईल. एअरपोर्टवर प्रवाशांचे सम्पल्स घेऊन त्यांना थांबवलं जाणार नाही, त्यांना सोडून दिलं जाईल.
IMA कडून कोरोनाच्या धर्तीवर नागरिकांना लग्न सोहळा, राजकीय कार्यक्रम किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे सार्वजनिक मेळावे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), मास्क (Mask) आणि सॅनिटायझरचा (Sanitizer) जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे