देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 19,885 वर, गुजरातमध्ये रुग्ण वाढले

देशात रुग्णांची संख्या वाढली

Updated: Apr 22, 2020, 10:07 AM IST
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 19,885 वर, गुजरातमध्ये रुग्ण वाढले title=

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा 20 हजाराजवळ पोहोचला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे 19,885 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 15 हजार 474 रुग्णांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्ह आहे. तर कोरोनामुळे 640 लोकांना मृत्यू झाला आहे. 3,870 जण बरे झाले असून मागील 24 तासात 50 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. येथे आतापर्यंत 5218 रुग्ण सापडले आहेत. तर 251 लोकांचा मृत्यू झाला आहे. 722 लोक आतापर्यंत हरे झाले आहेत. दिल्लीला मागे टाकत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. येथे आतापर्यंत 2178 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 90 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तिसरा क्रमांक दिल्लीचा आहे. येथे आतापर्यंत 2156 रुग्ण आढळले आहेत, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर राजस्थानचा नंबर येतो. येथे आतापर्यंत 1659 रुग्ण आढळले असून त्यातील 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाचव्या क्रमांकांवर तामिळनाडू आहे. येथे 1596 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 18 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशात आतापर्यंत 1552 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या देखील  वाढली आहे. आता येथे रुग्णांची संख्या 1294 झाली आहे तर 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सात राज्यांमधील रुग्णांचा आकडा 1000 पेक्षा जास्त आहे.

आंध्र प्रदेशात आतापर्यंत 775 प्रकरण (२२ मृत्यू), अंदमान-निकोबारमध्ये 16, अरुणाचल प्रदेशात 1, आसाममध्ये 35 (एकाचा मृत्यू), बिहारमध्ये 126 (2 मृत्यू), चंढीगड 27, छत्तीसगड 36, गोवा 7 , हरियाणा 254 मामले (3 मृत्यू) हिमाचल प्रदेश 39 (एकाचा मृत्यू).

जम्मू-काश्मीर 380 (5 मृत्यू), झारखंड 45(3 मृत्यू), कर्नाटक 418 (17 मृत्यू), केरळ 427 मामले (3 मृत्यू), लद्दाख 18 , मणिपूर 2, मेघालय 12 (एकाचा मृत्यू), मिजोरम 1 आणि ओडिशा 79 (एकाचा मृत्यू).

पुदुचेरी 7, पंजाब 245 (16 मृत्यू), तेलंगणा 928 (23 मृत्यू), त्रिपुरा 2, उत्तराखंड 46, पश्चिम बंगाल 423 (15 मृत्यू).