नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची वाढती गती लक्षात घेता केंद्र सरकार प्रत्येक पाऊल उचलत आहे. यासह, प्रत्येकाला खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. लोकांना सतत मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टन्स ठेवण्याचा आग्रह धरला जात आहे. कारण या दोन्ही पद्धती लोकांना सुरक्षित ठेवू शकतात.
दरम्यान, नुकताच एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की आता लोकांनी एकाच वेळी डबल मास्क घालावे म्हणजे दोन मास्क घालावे. अहवालानुसार दोन मुखवटे परिधान केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका 85 ते 88 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
The latest research shows that wearing a double mask- a surgical mask and a cloth mask together prevents COVID19 infection by 85% to 88% Urge people to wear a mask: Dr Dhruv Chaudhary, Head, Dept of Pulmonary and Critical Care Medicine, PGIMS Rohtak & Haryana Nodal Officer-COVID pic.twitter.com/K50WXXiosM
— ANI (@ANI) April 27, 2021
पीजीआयएमएस रोहतकचे संचालक डॉ ध्रुव चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी नोंदवले की, डबल मास्क कोविड -19 विषाणूपासून 85 ते 88 टक्क्यांपर्यंत संरक्षण करू शकते. ते म्हणाले की जर एखाद्या व्यक्तीने कपड्यांचा मुखवटा आणि सर्जिकल मुखवटा एकत्रित घातला तर त्याला कोरोना विषाणूपासून बर्याच प्रमाणात संरक्षण मिळू शकते. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी मास्क घालायला हवे, अशी विनंती त्यांनी केली.
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संसर्गापासून वाचायचं असेल तर प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड मिळणं कठीण झाले आहे. ऑक्सीजन मिळत नसल्याने मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कोरोना पासून लांब राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.