Corona Death : XBB.1 ने घेतला बळी; देशात कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटने महिलेचा मृत्यू

भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Varient) नवा व्हेरिएंट XBB.1 ने एक बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा भारतात खळबळ माजवली आहे. 

Updated: Jan 8, 2023, 04:45 PM IST
Corona Death : XBB.1 ने घेतला बळी; देशात कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटने महिलेचा मृत्यू title=

Corona Death : चीनमध्ये (China corona) कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनशिवाय अनेक देशांमध्ये (India Corona) कोरोनाने थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत भारत सरकार (Indian Government) देखील अलर्टवर आलं असून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र असं असूनही भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Varient) नवा व्हेरिएंट XBB.1 ने एक बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा भारतात खळबळ माजवली आहे. 

55 वर्षीय महिलेचा मृत्यू

भारताच्या इंदूर भागात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा नवा व्हेरिेएंट XBB.1 ची एका 55 वर्षीय महिलेला लागण झाली होती. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. 

135 दिवसांनंतर शहरात मृत्यूची कोरोनामुळे नोंद करण्यात आली आहे. ज्या महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, ती गंभीररित्या न्युमोनियाने ग्रस्त असल्याचं समोर आलंय. न्युमोनियामुळे तिला अरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर ती ओमायक्रॉनच्या नव्या सब व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती मिळाली.

हॉस्पिटलमधील डॉ. विनोद भंडारी यांनी सांगितलं की, Omicron चा हा नवीन सब व्हेरिएंट इतरांपेक्षा अधिक पटीने अधिक घातक आहे. या व्हेरिएंटची पेशींना चिकटून राहण्याची क्षमता इतरांपेक्षा खूप जास्त असल्याचं समोर आलंय. या व्हेरिएंटने ग्रस्त असलेला व्यक्ती इतर अनेकांना संक्रमित करू शकते. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. 

नव्या रूग्णाची नोंद नाही

शनिवारच्या दिवसात शहरात कोरोनाच्या नव्या रूग्णाची नोंद करण्यात आली नाहीये. शनिवारच्या दिवशी 833 नमुन्यांची टेस्ट करण्यात आली, यामधून कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं समोर आलंय. 

कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच सुपरबगचा धोका

सर्वत्र कोरोना(corona)ने थैमान घातलेलं असतानाच आता  सुपरबगमुळे(Superbugs) मृत्यूचं तांडव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुपरबग हा जीवाणू, विषाणू, पॅरासाईटचा एक स्ट्रेन आहे. अँटिबायोटिकच्या गैरवापर तसेच याच्या अतीवापरामुळे सुपरबग तयार होतो. सुपरबग बनल्यानंतर याचा संसर्ग कोणत्याही औषधांनी मरत नाही. जखम, लाळ, लैंगिक संबंध, त्वचेच्या संपर्कातून सुपरबग पसरतो. सुपरबग इतर रोगांपेक्षा लोकांमध्ये वेगाने पसरत असल्याचे चिंता वाढली आहे. या सुपरबगवर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. 

भारत सरकारची नियमावली

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग तसंच थायलंड या ठिकाणहून येणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासांपूर्वी करण्यात आलेली RTPCR टेस्ट रिपोर्ट अपलोड करणं बंधनकार करण्यात आली आहे. Transiting प्रवाशांसाठी देखील हे अनिवार्य असून, भारतात आल्यानंतर पुन्हा त्यांची टेस्ट होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शन नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.