'मध्य प्रदेशात भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या संपर्कात'

आगामी निवडणुकीत भाजपला धक्का बसणार?

Updated: Sep 17, 2018, 10:51 AM IST
'मध्य प्रदेशात भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या संपर्कात' title=

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणुका लढवायला इच्छुक असल्याचा दावा मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी केला आहे. मध्यप्रदेशात २ हजारांपेक्षा जास्त उमेदवार तिकीटासाठी इच्छुक असल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला आहे. कमलनाथ हे काल इंदौर दौऱ्यावर होते. इंदौरमध्ये पदयात्रा काढून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला.

कमलनाथ यांनी रविवारी म्हटलं की, राज्यात एकूण 230 विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडे 2,500 लोकांनी दावा केला आहे. ज्यामध्ये 30 भाजप आमदारांचा समावेश आहे. भाजपचे आमदार माझ्या संपर्कात आहेत. ते माझ्या संपर्कात का आहेत याबाबत मी काही नाही सांगू शकत. दोन वेगवेगळ्या एजेंसींकडून सर्वेक्षण केल्यानंतर त्याच्या आधारावर जे विजयी होतील अशा व्यक्तींना तिकीट दिलं जाईल."