'काँग्रेसला औरंगजेब राजच्या शुभेच्छा'

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा मार्ग मोकळा झाला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 4, 2017, 04:18 PM IST
'काँग्रेसला औरंगजेब राजच्या शुभेच्छा' title=

धरमपूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी वगळता इतर कोणत्याही काँग्रेस उमेदवारानं अर्ज भरला नाही. त्यामुळे राहुल गांधींची निवड निश्चित झाली आहे.

मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाची तुलना औरंगजेबाशी केली आहे. काँग्रेसला औरंगजेब राज्याच्या शुभेच्छा अशी टीका मोदींनी केली आहे. काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत मोदींनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले होते मणीशंकर अय्यर

मुघलांच्या कारकिर्दीमध्ये निवडणुका झाल्या का? जहांगिरानंतर शहाजहान आला, तेव्हा निवडणुका झाल्या का? शहाजहाननंतर औरंगजेब पुढचा राजा होईल हे माहिती होतं, असं मणीशंकर अय्यर म्हणाले होते. काँग्रेसला आपण कौटुंबिक पक्ष आहोत हे मान्य आहे का? आम्हाला हे औरंगजेब राज नको असं मोदी म्हणाले. 

मणीशंकर अय्यर यांची प्रतिक्रिया 

दरम्यान याबाबत मणीशंकर अय्यर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दोन्ही गोष्टींची तुलना करू नका. जहांगिरनंतर शहाजहान नेता होईल हे माहिती होतं. पण काँग्रेसमध्ये राहुल गांधींविरोधात निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ही लोकशाही प्रक्रिया असल्याचं अय्यर म्हणाले.