कोरोना काळात हेल्थ इन्शुरन्सबद्दलची चिंता मिटली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Health Insurance: कोरोना महामारी दरम्यान, आरोग्य विम्याबाबत चांगली माहिती समोर आली आहे. 

Updated: May 27, 2021, 05:23 PM IST
कोरोना काळात हेल्थ इन्शुरन्सबद्दलची चिंता मिटली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : Health Insurance: कोरोना महामारी दरम्यान, आरोग्य विम्याबाबत चांगली माहिती समोर आली आहे. सूत्रांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या आरोग्य विम्याचा प्रीमियम वाढणार नाही. विमा रेग्युलेटर IRDAI ने सामान्य विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. की कंपन्यांनी कोरोना संसर्गादरम्यान या वर्षी प्रीमियम वाढवू नये.

आरोग्य विम्याचा प्रीमियम वाढणार नाही

तुमच्या विम्याचा रिन्युअल जवळ आला असेल, किंवा तुम्हाला नवीन विमा खरेदी करायचा असेल तर, तुमच्यावर प्रीमियमचा जास्त बोझा पडणार नाही. खरेतर कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य विम्याच्या क्लेममध्ये मोठी वाढ झाली आहे. आणि कंपन्यांवर प्रीमियम वाढवण्याचा दबाव आहे.
परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आणि IRDAI ने प्रीमियम वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

15 लाखाहून अधिक कोविड क्लेम

GIC च्या आकडेवारी नुसार 20 मे पर्यंत वीमा कंपन्यांना 15.32 लाख कोविडशी संबधीत क्लेम मिळाले आहेत. ज्यांची एकूण किंमत 23 हजार कोटीहून जास्त आहे.