मुंबई : मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव' मधून प्रकाशझोतात आलेली प्रिया प्रकाश वारिअर....
एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन बनलेल्या प्रिया आणि निर्माताच्या विरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल झाली आहे. या सिनेमातील रिलीज झालेल्या पहिल्या गाण्यातील शब्दावर आपत्ती दर्शवत ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या गाण्यातील शब्दामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. प्रियाचा हा व्हिडिओ ओरू उदार लव या सिनेमातील असून याच्या एका छोट्याशा व्हिडिओमुळे धुमाकूळ घातला गेला. पण या व्हिडिओमुळे समाजाची भावना दुखावली गेली.
दोघंही शाळेच्या वर्गात एकमेकांसोबत फ्लर्ट करत आहे. प्रिया प्रकाशचा हा डेब्यू सिनेमा असून ती पहिल्याच सिनेमांतून लोकप्रिय झाली आहे. हा सिनेमा 3 मार्च 2018 रोजी रिलीज होणार आहे. मंगळवारी किस डेच्या दिवशी 13 फेब्रुवारीला या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.
प्रियाला चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाने नक्कीच आनंद झाला असेल. मात्र तिच्या कुटुंबियांना चांगलाच मनस्ताप होतो आहे. प्रियाने चाहत्यांच्या प्रेमावर आनंदही व्यक्त केलाय. त्यानंतर आता तिच्या आईने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या लोकप्रीयतेने प्रिया प्रकाश किती आनंदी आहे, हे आम्हाला ठाऊक नाही, असे म्हणत तिच्या आईने यावर नाराजीच व्यक्त केली आहे.