मान्सून दाखल होतोय... तयार राहा!

सध्या देशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय. 

Updated: May 27, 2017, 08:27 AM IST
मान्सून दाखल होतोय... तयार राहा! title=

मुंबई : सध्या देशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय. 

पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील तीन-चार दिवसांत मान्सून दक्षिण केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल. 

दरम्यान, पूर्व विदर्भात आणखी तीन दिवस पारा चढलेलाच राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय.