उत्तर प्रदेशात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू

संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असल्याचं पहायला मिळत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत थंडीने हुडहुडी भरवली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 5, 2018, 07:52 PM IST
उत्तर प्रदेशात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू title=
Image: File - AP

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असल्याचं पहायला मिळत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत थंडीने हुडहुडी भरवली आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भागांत तापमान ६ अंशापेक्षा खाली गेलं आहे. संभल जिल्ह्यात तर थंडीने गारठून दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. 

संभल जिल्ह्यातील असमोलीमध्ये राजेंद्र नावाच्या ३० वर्षीय मजदूराचा मृत्यू झाला आहे. राजेंद्रच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रला ताप आला होता. रात्री जवळपास ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांकडे नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

तर, संभल जिल्ह्यातीलच चंदौसीमध्ये बेरनी गावात ५० वर्षीय शेतकरी शिवराज यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी शिवराज यांचा थंडीने गारठून मृत्यू झाला.

गेल्या २४ तासांत आग्रा आणि मेरठ या विभागांत रात्रीचं तापमान खालावल्याचं पहायला मिळालं. मुझफ्फरनगरमध्ये तापमान ३.४० अंश सेल्सियस नोंदविण्यात आलं. हा राज्यातील यंदाच्या मोसमातील नीचांक होता.