नक्षलवाद्यांनी भारतीय जवान राकेश्वर सिंहला सोडलं, हल्ल्यानंतर केलं होतं अपहरण

नक्षलवाद्यांनी केला होता जवानांच्या ताफ्य़ावर हल्ला, 22 जवान झाले होते शहीद

Updated: Apr 8, 2021, 06:29 PM IST
नक्षलवाद्यांनी भारतीय जवान राकेश्वर सिंहला सोडलं, हल्ल्यानंतर केलं होतं अपहरण title=

रायपूर : नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह यांना सोडून दिले आहे. या बातमीनंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे. राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने सरकारचे आभार मानले आहेत.

3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बिजापुरात जवानांवर हल्ला झाला होता. यानंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांचं अपहरण केलं होतं. या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते तर अनेक जवान जखमी झाले होते.

नक्षलवाद्यांनी म्हटलं होतं की, 3 एप्रिलला 2 हजार भारतीय जवान हल्ला करण्यासाठी जीरागुडेम गावाजवळ पोहोचले होते. त्यांना रोखण्यासाठी हल्ला केला गेला होता. नक्षलवाद्यांनी एका जवानाचं अपहरण केल्याचं देखील सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, सरकारने आधी मध्यस्थींच्या नावाची घोषणा करावी, त्यानंत जवानाला सोडण्यात येईल.