100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 14 लाखांचा रिटर्न, Post Office ची योजना समजून घ्या !

मनीबॅकसोबतच विमा संरक्षण देखील मिळेल

Updated: Apr 8, 2021, 05:43 PM IST
100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 14 लाखांचा रिटर्न, Post Office ची योजना समजून घ्या ! title=

नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक जीवन विमा योजना आहेत ज्या तुम्हाला कमी गुंतवणुकीत लखपती बनवतात. ग्राम सुमंगल ग्रामीण टपाल जीवन विमा योजना (Gram Sumangal Rural Postal Life Insurance Scheme) ही त्यापैकी एक आहे. एक एंडोवमेंट (endowment ) योजना आहे. जी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना मनीबॅकसोबतच विमा संरक्षण पुरवते. या योजनेंतर्गत दोन प्लान आहेत.

तुम्ही जर दररोज 95 रुपयांची गुंतवणूक केली तर योजनेच्या शेवटी तुम्हाला 14 लाख रुपये मिळू शकतात. ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना 1995 मध्ये सुरू केली गेलीय. डाकघर या योजनेंतर्गत 6 वेगवेगळ्या विमा योजना ऑफर केल्या गेल्यायत. त्यातलीच ही सुमगंल योजना आहे. 

ज्यांना वेळोवेळी पैशाची आवश्यकता असते त्यांच्यासाठी ही सुमंगल योजना खूप फायदेशीर आहे. मनी बॅक इन्शुरन्स पॉलिसी ग्राम सुमंगल योजनेत जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचे  सम एश्योर्ड मिळते. पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीच्या कालावधीत जर व्यक्ती मरण पावली नाही तर त्याला मनीबॅकचा फायदा देखील मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर नामनिर्देशित व्यक्तीला विमाराशीसह बोनस देखील दिला जातो.

पॉलिसी सुमंगल योजना दोन कालावधीसाठी उपलब्ध आहे.15 वर्षे आणि 20 वर्षेांसाठी ही योजना आहे. या पॉलिसीसाठी किमान वय 19 वर्षे असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त 45 वर्षांची व्यक्ती ही योजना 15 वर्षांच्या कालावधीसाठी घेऊ शकते. 20 वर्षांसाठी ही योजना जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती घेऊ शकते.

असे मिळतील 14 लाख रुपये 

पॉलिसीमध्य 8 व्या, 12 व्या आणि 16 व्या वर्षी 20-20 टक्क्यांच्या हिशोबानुसार 1.4-1.4 लाख रुपये रक्कम मिळेल. अखेरीस, 20 व्या वर्षी, विमा राशी म्हणून 2.8 लाख रुपये देखील दिले जातील. जेव्हा प्रति वार्षिक बोनस 48 रुपये असतो तेव्हा 7 लाख रुपयांच्या रकमेवर वार्षिक बोनस 33600 रुपये असतो. म्हणजेच संपूर्ण पॉलिसीच्या कालावधीसाठी म्हणजेच 20 वर्षांचा बोनस 6.72 लाख रुपये होतो. 

२० वर्षांत एकूण 13.72 लाखांचा फायदा होईल. यापैकी 2.2 लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिली जाईल. सोबतच 9.52 लाख रुपये मॅच्योरीटीवेळी दिली जाईल.