CM योगी ही म्हणाले, 'मी पुन्हा येईन, 35 वर्षांचा रेकॉर्ड मोडेन'

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून जोरदार तयारी सुरु झालीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केलाय. यावेळी आपण 35 वर्षाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी आलो असल्याचे योगींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशात भाजपकडून केलेल्या कामांची जोरदार जाहीरातबाजी सुरु आहे.

Updated: Sep 16, 2021, 03:43 PM IST
CM योगी ही म्हणाले, 'मी पुन्हा येईन, 35 वर्षांचा रेकॉर्ड मोडेन' title=

लखनऊ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून जोरदार तयारी सुरु झालीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केलाय. यावेळी आपण 35 वर्षाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी आलो असल्याचे योगींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशात भाजपकडून केलेल्या कामांची जोरदार जाहीरातबाजी सुरु आहे.

योगी सरकारने य़ा दरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेतले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीत (UP assembly Eletion) 300 हून अधिक जागा जिंकण्याच्या दावा त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील सगळेच पक्ष निवडणुकीच्या आधी तयारीला लागले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीत आपण पुन्हा सत्तेत येऊ असं म्हटलं आहे.
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलाखतीदरम्यान म्हटलं की, 'मी पुन्हा येईन, आम्ही रेकॉर्ड तोडायलाच आलो आहोत.' 35 वर्षात दुसऱ्यांदा कोणीही सत्तेत आलं नाही या प्रश्नावर उत्तर देताना योगींनी हे वक्तव्य केलं आहे. या शिवाय भाजपला 350 हून एकही जागा कमी मिळणार नाही असा दावा ही त्यांनी केला आहे.

योगी सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केलीये. तसेच आशा सेविकांना ही 4000 मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय अनेक वेगवेगळे लोकहिताचे निर्णय घेत योगी सरकारने निवडणुकीच्या आधी जोरदार तयारी केली आहे.