अहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या समवेत योग्याभ्यास केला. यावेळी सुमारे सव्वा लाख लोकं उपस्थित होते. यावेळी मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला.

Updated: Jun 21, 2017, 08:42 AM IST
अहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा title=

अहमदाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या समवेत योग्याभ्यास केला. यावेळी सुमारे सव्वा लाख लोकं उपस्थित होते. यावेळी मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील यावेळेस तेथे उपस्थित होते. बाबा रामदेव यांच्यासोबत त्यांनी कपाल भाती, भस्त्रिका, अनुलोम-विलोम आणि प्राणायम केले. बाबा रामदेव यांनी यावेळेस योगाचा मुलमंत्र लोकांना समजावला.