हातांचं सौंदर्य वाढवायचं ..स्किन टोननुसार निवडा नेलपेंटचा रंग..पहा तुम्हाला कोणता रंग होतोय सूट

पेस्टल मध्ये रेड आणि डार्क पिंक शेडमध्ये खेळू शकता मात्र कोणताही ब्राईट रंगाचं नेलपेन्ट निवडू नका 

Updated: Jul 30, 2022, 09:22 PM IST
हातांचं सौंदर्य वाढवायचं ..स्किन टोननुसार निवडा नेलपेंटचा रंग..पहा तुम्हाला कोणता रंग होतोय सूट  title=

सुंदर दिसायला कोणाला आवडणार नाही यासाठी आपण स्वतःकडे खूप लक्ष देत असतो मग ते स्किन असो कि ड्रेससिंग सेन्स असो सगळं काही परफेक्ट हवं म्हणून खूप प्रयत्न करत असतो .. आजकाल मेकअप आणि आऊटफिट सोबत स्टायलिशनखं  सुद्धा  ट्रेंडमध्ये आहेत. आतापर्यंत नॅचरल नखांना सुंदर स्वच्छह ठेवण्यासाठी महिलॅन खूप प्रयत्न करावे लागायचे विशेषतः नख वाढवताना खूप कसरत व्हायची ..पण मार्केट मध्ये आता फेक नेल्स सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे हा त्रास थोडा का होईना  कमी झालाय ..
नख नॅचरल असो किंवा फेक त्यांना आकर्षित सुंदर बनवण्याचं महत्वाचं काम करत ते नेलपेंट..

मार्केटमध्ये एक ना अनेक रंगाचे नेलपेंट्स उपलब्ध आहेत  नेलपेंटचे खूप ऑप्शन आपल्यासमोर आहेत अशा वेळी बेस्ट रंग निवडणं खूप जोखमीचं होऊन बसतं पण मग बऱ्याचदा असं होत कि आपण एखादा रंग निवडतो पण तो लावल्यानंतर आपल्या नखांवर तो सूट होत नाही .. 

मात्र नेलपेंट हातावर सुंदर दिसावं असं तुम्हाला वाटत असेल नेलपेंट चा रंग निवडताना तुमच्या स्किन टोन नुसार तो निवडावा जेणेकरून तुमची नखं आणखी सुंदर दिसतील 
चला तर मग जाणून घेऊया तुमच्या स्किन टोन वर कोणता रंग छान दिसेल 

1 पेल कॉम्प्लेक्शन 

जर तुमचा स्किनटोन पेल कॉम्प्लेक्शन अशा टाईप मध्ये आहे तर तुम्ही लाईट पिंक किंवा ब्लू कलर निवडू शकता 
पेस्टल मध्ये रेड आणि डार्क पिंक शेडमध्ये खेळू शकता मात्र कोणताही ब्राईट रंगाचं नेलपेन्ट निवडू नका

2 लाईट कॉम्प्लेक्शन- व्हाइट, सिल्वर, सॉफ्ट ऑरेंज, डार्क पिंक, रेड हे कलर्स तुम्ही वापरू शकता

3 टॅन कॉम्प्लेक्शन - या स्किनटोनसाठी तुम्ही कोणताही लाईट रंग जसा कि पर्पल ब्लू पिंक निवडू शकता 

4 मिडीयम कॉम्प्लेक्शन -या स्किनटोन साठी  डार्क कलर्समध्ये  बरगंडी, वाइन कलर निवडू शकता ,वाइब्रेंट आणि लाइट कलर्स सुद्धा वापरू शकता 

5 डार्क कॉम्प्लेक्शन -ब्राइट कलर्स ऑरेंज, पिंक आणि  रेड हे चांगले ऑप्शन्स आहेत  ग्रे आणि  ब्लैक कलर्स चुकूनही लावू नका