नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. गेल्या वर्षी सर्वत्र पसरलेल्या कोरोना व्हायरसने कित्येकांचे प्राण घेतले. मात्र आता कोरोनाची लस विकसित झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आईस्क्रीममध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. उत्तर चीनमध्ये आईस्क्रीवर कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे उत्तर चीनमध्ये भीतीचं वातावरण आहे.
The Daqiaodao Food Co., Ltd.या कंपनीच्या आईस्क्रीमध्ये कोरोनाचे विषाणू आढळले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासननाने आयस्क्रीम कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय कंपनीला सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
कंपनीतील कर्मंचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्व कर्मंचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत 1 हजार 662 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 700 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. इतर कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट आले नसल्याची माहिती प्रशासनानं स्थानिक माध्यमांना दिली.
प्रशासनाने दिलेल्यामाहितीनुसार, 29 हजार आयस्क्रीमच्या डब्यांची विक्री अद्याप झाली नाही. फक्त ३९० डब्बेच तियानजिनमध्ये विकले गेले. त्यामुळे आता आयस्क्रीम खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेतला जात आहे.