विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने चालत्या बसला आग; १० प्रवाशांचा मृत्यू

मध्यरात्री घडली घटना

Updated: Jan 17, 2021, 09:07 AM IST
विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने चालत्या बसला आग; १० प्रवाशांचा मृत्यू  title=

राजस्थान : राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील महेशपुरा गावात शनिवारी रात्री एक मोठी (Rajasthan Bus Caught Fire)  दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसचा विजेच्या तारांशी संपर्क आल्याने बस आगीच्या विळख्यात अडकली. या दुर्घटनेत १२ प्रवाशांना या आगीचा फटका बसल्या ज्यातील १० प्रवाशांचा (10 died in Rajasthan Fire) मृत्यू झाला आहे. 

विजेच्या तारांच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागली. होरपळून १० प्रवाशांचा मृत्यू झाला. एकूण ४० प्रवासी या बसमध्ये होते. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याकडे लक्ष दिलं . जखमी प्रवाशांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.

ही दुर्घटना आरजे ५१ पीए ०३७५ या क्रमांकाच्या बसमध्ये घडली. रस्ता चुकल्यामुळे ही बस गावात घुसली होती. ही बस ४० प्रवाशांनी भरली असून ती मांडोली ते ब्यावरकडे निघाली होती. मात्र रस्ता चुकल्यामुळे ती महेशपुरा गावात घुसली. गावातील ११ केवीच्या विजेच्या तारेशी बसचा संपर्क आल्यामुळे बसने पेट घेतला. 

आज मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला. खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली. पुणे लेनवर सकाळी ६ वाजता धावत्या ट्रकने पेट घेतला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.