नवी दिल्ली : पंजाबच्या खरडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलविंदर सिंह नावाच्या एका व्यक्तीने महिला अधिकारी नेहा शौरी यांच्या कार्यालयात जावून त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. आरोपी बलविंदर सिंह यांने १० वर्षाआधीच्या पूर्वैवैमनस्यातून ही हत्या केल्य़ाचं बोललं जात आहे. नेहा शौरी या रोपड जिल्ह्यात ड्रग अधिकारी पदावर असताना त्यांनी २००९ मध्ये आरोपीच्या मोरिंडा येथील केमिस्ट शॉपवर कारवाई करत त्याचं लायसन्स रद्द केलं होतं. पंजाब पोलिसांनी म्हटलं की, बलविंदर याने त्याचं लायसेंस रद्द केल्यामुळे ही हत्या केली. शुक्रवार सकाळी नेहा शौरी या खरड येथील आपल्या कार्यालयात पोहोचले होते. आरोपी बलविंदर सिंह याने 11 वाजून 40 मिनिटांनी त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. बॅगेत लपवून त्याने बंदूक आणली होती. यावेळी कार्यालयात फक्त एकच गार्ड होता. पण तो बलविंदर सिंहला पाहू शकला नाही.
आरोपी बलविंदरने महिला अधिकाऱ्याला गोळ्या झाडल्या ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नेहा शौरी या आपल्या ३ वर्षाच्या भाची सोबत होत्या. त्यावेळी त्यांची हत्या करण्यात आली. आराध्या ही पहिल्यांदाच कार्यालयात आली होती.
नेहा शौरी यांनी पंजाब यूनिवर्सिटीमधून बी फार्म झाल्या आहेत. त्यानंतर २००४ ते २००६ दरम्यान त्यांनी नायपरमधून एमएस फार्मास्यूटिक्सची डिग्री घेतली. त्यानंतर त्यांची ड्रग इंस्पेक्टर पदावर नियुक्ती झाली. २०१६ मध्ये त्या लाइसेंसिंग अथॉरिटी पदावर तैनात झाल्या. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु आहे. आरोपी बलिंदर हा मोरिंडामध्ये औषधांचं दुकान चालवायचा. २००९ मध्ये नेहा शौरी यांनी त्यांच्या दुकानावर छापा टाकत त्यांच्या दुकानातून अमंली पदार्थ जप्त केल्या होत्या. त्यानंतर त्यांचं लायसेन्स रद्द करण्यात आलं होतं.