चंद्रावरील तापमान मानवाला झेपेल का? चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला अत्यंत महत्वाचा प्रयोग

चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला प्रयोगाबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. विक्रम लँडरच्या ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्रावरील तापमानाचे निरिक्षण करण्यात आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 27, 2023, 03:57 PM IST
चंद्रावरील तापमान मानवाला झेपेल का? चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला अत्यंत महत्वाचा प्रयोग title=

Chandryan-3 Mission Update:  चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला प्रयोग करण्यात आला आहे. विक्रम लँडरमध्ये असलेल्या ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्रावरील तापमानाचे निरिक्षण करण्यात आले आहे. ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर नेमके कशा प्रकारचे तापमान आहे याचा अभ्या केला जाणार आहे. या निरिक्षणाच्या मदतीने चंद्रावरील तापमान मानवाला झेपेल का याचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे. 

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर मोठी जबाबदारी

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान -3 मोहीम यशस्वी झाली आहे.  23 ऑगस्ट 2023 रोजी भारतानं विक्रम लँडर चंद्रावर उतरवून तिरंगा फडकवला. यानंतर आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर मोठी जबाबदारी आहे. चंद्रावर भूकंप होतात का? चंद्रावर पाणी आहे का? चंद्रावरील तापमान कसे आहे? याचे निरीक्षण विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर करत आहे. 

ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाचे निरीक्षण

विक्रम लँडर वर असलेल्या ChaSTE पेलोड च्या मदतीने  चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाचे निरीक्षण केले जात आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करत आहे. ChaSTE पेलोड हा तापमान मापक आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे थर्मल गुणधर्म मोजण्यासाठीच म्हणजेच चंद्राचे तापमान किती आहे, त्यात किती चढ-उतार होतात याचा अभ्यास करत आहे. 

ChaSTE पेलोडच्या मदतीने पहिला प्रयोग

ChaSTE पेलोड मध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर आहेत. ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्रावरील पृष्ठभागावरील जमीनीच्या 10 cm पर्यंतच्या तापमानाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. दहा वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सरच्या मदतीने तापामानाचे निरिक्षण केले जाणार आहे. यामुळे चंद्रावरील पृष्ठभागावरील तापमानात कशा प्रकारचे बदल होतात. याचे निरीक्षण सुरु आहे. लवकरच या नरीक्षणाचा तपशील समोर येईल. या तापमानाच्या निष्कर्षाच्या मदतीने अनेक रहस्य उलगडणार आहेत. अहमदाबाद   स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी (एसपीएल), व्हीएसएससी यांच्या मदतीने हे ChaSTE पेलोड विकसीत करण्यात आले आहे. 

विक्रम लँडरसह प्रज्ञान रोव्हर देखील चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करत परीक्षण करत आहे. चंद्रावर गेलेल्या प्रज्ञान रोव्हरनं नवा व्हिडिओ पाठवलाय. इस्रोनं हा नवा व्हिडिओ ट्विट केलाय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हर फिरतोय. त्यानं पाठवलेला हा नवा व्हिडिओ आहे.  प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने चंद्रावर पाण्याचा शोध घेतला जाणार आहे.