ISRO प्रमुख एस सोमनाथही इन्स्टाग्रामवर; पण, फक्त 'या' व्यक्तीलाच करतात फॉलो..

Chandrayaan 3: चांद्रयान 3 मोहिमेच्या वाट्याला आलेलं यश काही नावं प्रकाशझोतात आणून गेलं. ही नावं आहेत इस्रोसाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची, अवकाशासाठी कार्यरत असणाऱ्या किमयागारांची.   

सायली पाटील | Updated: Aug 24, 2023, 11:44 AM IST
ISRO प्रमुख एस सोमनाथही इन्स्टाग्रामवर; पण, फक्त 'या' व्यक्तीलाच करतात फॉलो.. title=
Chandrayaan 3 ISRO Chief S Somnath instagram

ISRO Chandrayaan 3 Updates: तब्बल 140 कोटी भारतीयांच्या महत्त्वाकांक्षांसह भारताचं चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं आणि एक नवा इतिहास रचला गेला. जे कोणत्याही देशाला जमलं नाही की किमया करत थेट चंद्राचं दक्षिणेकडील टोक गाठत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं एक मापदंड आखला. हे यश अतुलनीय ठरलं आणि संपूर्ण देशातून इस्रोच्या शास्त्रज्ञांनवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. मुळातच इस्रोच्या प्रत्येक कामगिरीला देशानं आजवर उचलून धरलं आहे. त्यात चांद्रयानाचं यश म्हणजेे दुग्धशर्करा योग. या यशाचं श्रेय इस्रोच्या स्थापनेपासून आतार्यंतच्या प्रवासातील प्रत्येकाच्याच योगदानाला जातं. पण, त्यातही चांद्रयान 3 मोहिमेचं प्रतिनिधीत्त्वं करणाऱ्या डॉ. एस.सोमनाथ (ISRO Chief Dr. S Somnath ) यांचं विशेष कौतुक. 

अपयशी मोहिमेतून खूप काही शिकत त्यांनी आपल्या साथीदार शास्त्रज्ञांच्या मदतीनं हे यश संपादन केलं. इस्रोच्या वाट्याला आलेल्या या यशानंतर सोमनाथ यांनी जगभरातील माध्यमांना संबोधित केलं. यावेळी त्यांच्या साधेपणानं सर्वांची मनं जिंकली. सोमनाथ यांनी यावेळी त्यांच्या टीमचे आभार मानत विभागप्रुमखांची नावं जगासमोर आणली. 

सोशल मीडियावरही सोमनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव 

इस्रो प्रमुखांच्या नावाची सोशल मीडियावरही वाहवा झाली. अनेकांनीच त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट शोधण्यासाठीही धाव मारली. ज्यामध्ये इन्स्टाग्रामवर त्यांचं अकाऊंट आढळलं. अर्थात या अकाऊंटवर Blue Tick नसल्यामुळं ते चटकन लक्षात आलं नाही. पण, शास्त्रज्ञ आणि इस्रोप्रमुख असा उल्लेखच तिथं पुरेसा ठरला. आता इस्रोप्रमुख म्हटल्यावर ते कोणाकोणाता फॉलो करतात याबाबतचं कुतूहलही वाढलं. पण, लगेचच लक्षात आलं की इस्रो प्रमुख फक्त एकच अकाऊंट फॉलो करतात आणि ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. 

इस्रोप्रमुखांचे साथीदार कोण? 

पुन्हा एकदा चांद्रयान 3 मोहिमेकडे वळलं असता, या यशानंतर पहिली प्रतिक्रिया देत सोमनाथ म्हणाले होते, 'या यशात शास्त्रज्ञांचं मोलाचं योगदान आहे. चांद्रयान 1, चांद्रयान 2 अशा टप्प्यांनी ही मोहिम पार पडली. किंबहुना चांद्रयान 2 ची उपकरणं अद्यापही कार्यरत आहेत. चांद्रयान 3 च्या यशासाठी चांद्रयान 1 आणि 2 साठी काम करणाऱ्या सर्वच शास्त्रज्ञांचे आभार आणि अभिनंदन'. 

हेसुद्धा वाचा : Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos

s somnath

इस्रो प्रमुखांना या मोहिमेत मिशन डायरेक्टर श्रीकांत, प्रोजेक्ट डायरेक्टर पी. वीरमुथ्थुवेल, असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर के.कल्पना, यु.आर.राव सॅटेलाईट सेंटर डायरेक्टर एम शंकर यांच्या टीम्सनं प्रचंड मदत केली. इस्रोची हीच 'साधी माणसं' आजच्या घडीला देशवासियांसाठी एखाद्या सुपरहिरोहून कमी नाहीत.