Chanakya Niti For Happy Married Life: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे मौर्य राजवटीचे राजकारणी आणि राजेशाही सल्लागार होते. त्यांनी लोकांच्या वागणुकीवर काही सिद्धांत लिहून ठेवले आहेत. त्याला चाणक्य नितिशास्त्र असं म्हणतात. चाणक्य सिद्धांतानुसार विवाहानंतर स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक ठरतात. पण जर कालानुरूप पत्नीमध्ये काही बदल दिसून आले तर ती तुमच्या आयुष्यातील समस्यांची सुरुवात असेल. बायको येताच वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करणारे असे कोणते बदल तुम्हाला माहीत आहेत का?
पत्नी लोभी आणि काटकसरी असेल तर अशा घराची कधीच उन्नती होत नाही. पत्नीने आपल्या इच्छा आणि लोभावर नियंत्रण ठेवले पाहिजे, जेणेकरून वैवाहिक जीवन आनंदी होईल, असं चाणक्य म्हणतात. मूर्ख बायकांसाठी पती शत्रूसारखा असतो. पत्नीच्या मूर्खपणामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होईल, असंही चाणक्य म्हणतात.
चाणक्याच्या मते, अनेक महिलांना खोटे बोलण्याची सवय असते. काही स्त्रियांना घरातील सदस्यांबद्दल गॉसिप करण्याची आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून गडबड करण्याची सवय असते. अशा महिलांवर कोणी विश्वास ठेवत नाही.
सुखी वैवाहिक जीवनासाठी पत्नी ही पतीचा आदर करणारी असावी आणि पतीनेही पत्नीचा आदर करावा. पत्नीच्या मनात आदर नसेल तर बायकोच्या वैवाहिक जीवनात कोणताही पुरुष सुखी होऊ शकत नाही, असंही चाणक्य सांगतात.
Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार 'हे' तीन गुण तुमच्याकडे पाहिजे, अन्यथा...
राग व्यक्त करणे ही स्त्रियांची सवय असते. पण प्रत्येक गोष्टीवर रागावणे योग्य नाही. रागावलेल्या बायका असलेल्या पुरुषांचे जीवन दयनीय होते. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नी दोघांनीही रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असंही चाणक्य आपल्या नितीशास्त्रात म्हणतात.