'बाई चुकलो मी, यापुढे दारु पिणार नाही ', पत्नीने असं काही केलं की पतीने टेकले गुडघे; पण सत्य समजल्यानतंर तोही चक्रावला

Viral News: पतीला दारुचं व्यसन असल्याने अनेक संसार मोडतात. पतीचं व्यसन सोडवण्यासाठी अनेकदा पत्नी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात. मात्र आग्र्यातील एका महिलने पतीचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला त्याच्याच पद्दतीने धडा शिकवला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 15, 2023, 07:14 PM IST
'बाई चुकलो मी, यापुढे दारु पिणार नाही ', पत्नीने असं काही केलं की पतीने टेकले गुडघे; पण सत्य समजल्यानतंर तोही चक्रावला title=

Viral News: संसार मोडण्यासाठी असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पतीला असणारं दारुचं व्यसन असतं. पती दारुच्या आहारी गेल्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडतात आणि अखेर ही प्रकरणं घटस्फोटापर्यंत पोहोचतात. पण अनेक स्त्रिया आपल्या पतीचं व्यसन सोडवण्यासाठी जीवाचं रान करत असतात. व्यसनमुक्ती केंद्रासासून ते रुग्णालपर्यंत अनेक ठिकाणी त्या फेऱ्या मारत असतात. पण एकदा लागलेलं हे व्यसन सोडवणंही तितकंच कठीण असतं. पण आग्रा येथे एका महिलेने पतीला त्याच्याच पद्धतीने धडा शिकवला आहे.
 
पतीचं दारुचं व्यसन सोडवण्यासाठी या महिलेने त्यांचा पिच्छा पुरवण्याऐवजी अशी पद्दत अवलंबली पतीला आयुष्यभराची शिकवण मिळाली आहे. पती नेहमी दारु पित असल्याने तसंच आपल्याशी भांडत असल्याने महिलेने आधी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे काहीच फरक पडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मात्र तिने कोणी विचारही करु शकणार नाही अशी गोष्ट केली. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती नेहमीच मद्यधुंद अवस्थेत घरी येत होता. तिने यावर आक्षेप घेतल्यानंतर तो नेहमी भांडण कत असते. हे रोज होत असल्याने मी कंटाळली होती.
 
रोज होणाऱ्या या भांडणामुळे पत्नीने एक भन्नाट आयडिया केली. तिनेही रोज आपण दारु पित असल्याचं नाटक करण्याचं ठरवलं. पत्नीला मद्यधुंद अवस्थेत पाहिल्यानंतर पतीला धक्काच बसला. ती कशी काय दारु पिऊ शकते? असा विचार त्याने केला. यानंतर तिने ज्याप्रकारे पती मारहाण करायचा त्याच पद्दतीने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

पण यानंतरही गोष्टी सुरळीत झाल्या नाहीत. पतीने यानंतरही दारु पिणं आणि पत्नीशी भांडणं कायम ठेवलं होतं. पण पत्नीने हार न मानता आपलं नाटक कायम ठेवलं. 

पत्नीदेखील आता आपल्याप्रमाणे दारुच्या आहारी गेल्याचं पतीला वाटलं. यानंतर त्याने कुटुंब समुपदेशन केंद्राकंडे मदत मागण्याचा निर्णय घेतला. कुटुंब समुपदेशन केंद्रात दोघांनीही एकमेकांवर दारुच्या आहारी गेले असल्याचा आरोप केला. 

यानंतर पतीने समुपदेशकाला एक व्हिडीओ दाखवला, ज्यामध्ये पत्नी त्याचा पाठलाग करत होती. यावेळी ती मद्यधुंद अवस्थेत होती असा दावा त्याने केला.आपली पत्नी दारुच्या आहारी गेली असून आपल्या वागण्याने कुटुंबाला बदनाम करत असल्याचं त्याने सांगितलं. 

यानंतर पत्नीने समुदेशकाकडे सगळा प्रकार उघड केला. पती रोज दारु पित असल्याने त्याला थांबवण्यासाठी आपणही दारु पित असल्याचा अभिनय करत होतो असं तिने सांगितलं. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर समुपदेशकाने दांपत्याला लिखीत करार करण्यास सांगितलं. यावेळी पतीने समुपदेशकासमोर आपण आठवड्यातून एकदाच दारु पिऊ असं लिहून दिलं. तसंच आपण कधीच पत्नीशा वाद घालणार नाही आणि भांडणार नाही असंही आश्वासन दिलं.