मोदीं विरोधात केजरीवाल सरकारला देशातील ४ मुख्यमंत्र्याचा पाठिंबां

दिल्लीत केजरीवाल सरकार विरोधात मोदी सरकार असं संघर्षाचं चित्र निर्माण झालं आहे.

Updated: Jun 16, 2018, 11:23 PM IST
मोदीं विरोधात केजरीवाल सरकारला देशातील ४ मुख्यमंत्र्याचा पाठिंबां title=

नवी दिल्ली : दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात नवा वाद उभा राहिला आहे. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केलेय. त्यासाठी त्यांनी मोदी सरकारविरोधात दंड थोपटले आहे. दिल्लीत केजरीवाल सरकार विरोधात मोदी सरकार असं संघर्षाचं चित्र निर्माण झालं आहे. दिल्लीतील राजकीय कोंडीवर तोडगा काढण्यासाठी देशातले ४ मुख्यमंत्री पुढे सरसावले आहेत.