मोदी सरकारची जबरदस्त कारवाई! Pakistani दहशतवाद्यांच्या नाड्या आवळल्या, J-K मध्ये संदेश पाठवणं आता अशक्य

Centre blocks Mobile Apps: केंद्र सरकारने (Centre Government) पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून (Pakistani Terrorist) वापरल्या जाणाऱ्या 14 मोबाइल अ‍ॅप्सवर (Mobile Apps) बंदी घातली आहे. गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence) या अॅपच्या माध्यमातून खोऱ्यात दहशतवादी प्रोपगंडा पसरवला जात होता अशी माहिती दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 1, 2023, 01:12 PM IST
मोदी सरकारची जबरदस्त कारवाई! Pakistani दहशतवाद्यांच्या नाड्या आवळल्या, J-K मध्ये संदेश पाठवणं आता अशक्य title=

Centre blocks Mobile Apps: केंद्र सरकारने (Centre Government) मोठी कारवाई केली असून दहशतवाद्यांचं (Terrorist) कंबरडं मोडलं आहे. केंद्र सरकारने दहशतवादी गटांकडून वापरल्या जाणाऱ्या तब्बल 14 मोबाइल अ‍ॅप्सवर (Mobile Application) बंदी घातली आहे. जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) दहशतवाद्यांकडून यांचा जास्त वापर केला जात होता अशी माहिती आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून दहशतवादी आपल्या समर्थकांशी तसंच इतरांशी कोडवर्डचा वापर करत संदेशाच्या माध्यमातून संवाद साधत होते. यासह या अ‍ॅप्सच्या माध्यमातून त्यांना पाकिस्तानमधून सूचनाही मिळत होत्या अशी सूत्रांची माहिती आहे. 

कोणत्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे?

ज्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second Line, Zangi आणि  Threema यांचा समावेश आहे. 

सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या सूचनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हे अ‍ॅप्सवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत होते. तसंच भारतीय कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करत होते. यामुळे संबंधित मंत्रालयाकडे या अ‍ॅप्सवर बंदी घातली जावी अशी विनंती करण्यात आली होती. ही विनंती केंद्र सरकारने स्विकारली असून माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत हे अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठांशी अधिृतपणे संवाद झाला असता गुप्तचर यंत्रणांनी हे अ‍ॅप्स काश्मीर खोऱ्यात दहशतवादी प्रोपगंडा पसरवत होते अशी माहिती देण्यात आली. 

एका अधिकाऱ्याने ANI शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "दहशतवादी आणि ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांची यंत्रणेकडून माहिती ठेवली जात आहे. संवादांचा मागोवा घेतला जात असताना एका ठिकाणी या मोबाइल अॅप्समध्ये भारतातील प्रतिनिधी नाही असं आढळलं. त्यामुळे या अॅप्समध्ये होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती ठेवणं अशक्य आहे".

गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने तब्बल 250 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समुळे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचं सांगत ही बंदी घालण्यात आली होती.

 

2020 पासून सरकारने एकूण 200 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये प्रसिद्ध अ‍ॅप्स TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, Xender, Camscanner, popular mobile games like PUBG Mobile आणि Garena Free Fire यांचा समावेश आहे.